Gold Rate | सोन्याचे भाव गडगडले.. सर्वसामान्यांना गुंतवणुकीची सुवर्णसंधी
Gold-Silver Price Today | रुपयापेक्षा डॉलर मजबूत होत आहे. जागतिक मंदीचा ससेमिरा सुरु आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर होत आहे. सोने गेल्या सहा महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आले आहे.
Gold-Silver Price Today | सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्याचा हा सध्या सुवर्ण योग आहे. रुपयापेक्षा डॉलर मजबूत होत आहे. जागतिक मंदीचा ससेमिरा सुरु आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर (Gold-Silver Price) होत आहे. सोने गेल्या सहा महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर (Lowest Level) आले आहे.
MCX वर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,300 रुपये आहे. हा दर 48,800 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर प्रोत्साहन मिळाल्यास हा दर प्रति 10 ग्रॅम 49,700 आणि 50,200 पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
रुपयापेक्षा डॉलरने मजबूत दावेदारी केल्याने सोन्यावर त्याचा परिणाम दिसून आला. चांदीची चमकही फिक्की पडली. भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर सहा महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचले आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये सोन्याचे दर घसरले होते. हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 49,200 रुपये होता. त्यानंतर सोन्याचा भाव 56 हजारांच्या जवळपास पोहचले होते.
मंगळवारी सोन्या-चांदीचे दर खाली आले होते. पण 16 ऑगस्ट रोजी सोने 50 हजार रुपयांच्याही खाली उतरले. सोन्याचा सरासरी दर 49,238 रुपयांवर पोहचला.
तर सकाळाच्या सत्रात सोन्याचा भाव 49,312 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहचला. सोन्यातील ही घसरगुंडी ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करु शकते.
https://ibjarates.com नुसार, आज शनिवारी, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 49,340 रुपये आहे. तर 22 कॅरेट शुद्ध सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 45,200 रुपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 55,144 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात.
22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं.
18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं. सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.