Gold Silver Price Today : सोने-चांदीचे शीर्षासन! मन मोराचा पिसारा फुलला, चला खरेदीला
Gold Silver Price Today : सोने-चांदीत सलग चौथ्या दिवशी घसरणीचे सत्र कायम आहे. जवळपास एक हजार रुपयांची सोन्यात घसरण झाली आहे तर चांदी 4 हजार रुपयांनी गडगडली आहे.
नवी दिल्ली : जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. डॉलरने (Dollar) शानदार बॅटिंग सुरु केली आहे. गेल्या दोन महिन्यांतील कसर डॉलरने भरुन काढली आहे. डॉलर गेल्या दोन महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे जागतिक बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीवर (Gold Silver Price) दबाव आहे. त्यामुळे भाव गडगडले आहेत.सोन्याने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी सोने 65,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता मावळली आहे. चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा गाठला होता. पण त्यापुढे चांदीला मजल मारता आलेली नाही. आठवडाभरात सोने एक हजाराने तर चांदी जवळपास 4 हजार रुपयांनी गडगडली. खरेदीदारांना ही पर्वणी साधता येईल.
डॉलरची बॅटिंग अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक धोरणांमुळे डॉलर पुन्हा मजबूत झाला आहे. तो सातत्याने उच्चांकी दिशेने सुसाट सुटला आहे. दोन महिन्यात डॉलरने जागतिक बाजारात पुन्हा पत उंचावली. डॉलर इंडेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, 103 वर पोहचला आहे.
आजचा भाव घ्या जाणून सोन्यात गेल्या चार दिवसांपासून घसरण सुरु आहे. चार दिवसांत सोने एक हजारांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, 20 मे रोजी या सोनेरी धातूत 10 रुपयांची मामूली घसरण झाली. ही सकाळच्या सत्रातील अपडेट आहे. आज 22 कॅरेट सोने 55,940 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेटचा भाव 61,010 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरले आहे.
अशी झाली पडझड
- 10 मे रोजी 22 कॅरेट सोने 57,100 रुपये तर 24 कॅरेट सोने 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
- मध्यंतरी सोनेरी धातूत दोनदा भावात 100,150 रुपयांची वाढ
- आठवडाभरात सोन्यात एक हजारांची घसरण
- 18 मे रोजी 22 कॅरेट सोने 56,250 तर 24 कॅरेटचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 19 मे 22 कॅरेट सोन्यात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 490 रुपयांची घसरण
24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,275 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,034 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,212 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,206 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
चांदीची घसरगुंडी ibjarates.com नुसार, आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. 18 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 71,808 रुपये होता. 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. एक किलो चांदीचा भाव 15 मे रोजी 72,455 रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण कायम आहे. चांदीत जवळपास चार हजारांची घसरण झाली.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.