Gold Silver Price Today : सोने आपटले दणकावून, चांदीचे झाले पानिपत, खरेदीची करा लगबग

Gold Silver Price Today : अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने-चांदी दबावाखाली आले आहेत. अमेरिकेतील महागाईने पुन्हा डोकेवर काढले आहे. तर तांब्यात मोठी घसरण झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेला चिंतेत टाकले आहे. त्यामुळे सोने-चांदी इतकी स्वस्त झाली आहे.

Gold Silver Price Today : सोने आपटले दणकावून, चांदीचे झाले पानिपत, खरेदीची करा लगबग
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 8:22 AM

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : जागतिक घडामोडी सोने-चांदीला सध्या अनुकूल नाही. दोन्ही धातूंनी ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात उसळी घेतली होती. त्यानंतर मौल्यवान धातू आगेकूच करण्यासाठी झगडत आहेत. सप्टेंबर महिन्यात तीन ते चार वेळा सोने-चांदीत वाढ झाली आहे. काल अमेरिकेतील महागाईचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे व्याजदर वाढीची चर्चा रंगली आहे. महागाईने डोकेवर काढल्याने सोने-चांदी (Gold Silver Price Today 13 September 2023) दबावाखाली आले आहे. चीनने गेल्यावेळी तांब्यात मोठी गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता चीनची अर्थव्यवस्था सध्या नाजूक वळणावर आहे. त्याचा ही परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी पुन्हा शेअर बाजार आणि इतर पर्यायांकडे मोर्चा वळवला आहे. सोने-चांदीत जोरदार पडझड झाली आहे. इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या भावानुसार दोन्ही धातू इतके स्वस्त झाले आहेत.

सोने झाले इतके स्वस्त

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिना खरेदीदारांना पावला आहे. या महिन्यात दरवाढीपेक्षा पडझडीचेच सत्र सुरु आहे. आता अर्धा सप्टेंबर होत आला आहे. पण याकालावधीत सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. 12 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 11 सप्टेंबरला सोन्यात 10 रुपयांची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी स्वस्त झाले. 8 सप्टेंबर रोजी भाव किंचित वधारला होता. 7 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले. 5 आणि 6 सप्टेंबरला या दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले होते. आतापर्यंत जवळपास 600 रुपयांची घसरण दिसून आली. 22 कॅरेट सोने 54990 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी वधारली

सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत चांदी 4000 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यातील दोन दिवसांत चांदी पाचशे रुपयांनी वधारली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 7 आणि 6 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 700 आणि 500 रुपयांची घसरण झाली. 5 सप्टेंबरला 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांनी स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,199 रुपये होते, काल हा भाव 58,865 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,962 वरुन 629 रुपये, 22 कॅरेट सोने 54,226 वरुन 53920 रुपये, 18 कॅरेट 44399 वरुन 44,149 रुपये, 14 कॅरेट सोने 34,631 वरुन 34,436 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 71,343 वरुन 70,900 रुपयांवर घसरला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.