Gold Price : सोन्याची गरुड भरारी, लवकरच किंमती मोडणार सर्व विक्रम? वायदे बाजारात उच्चांकी झेप, काय आहे आजचा भाव

Gold Price : सोने बाजारात करिष्मा दाखवणार असेच चित्र आहे..

Gold Price : सोन्याची गरुड भरारी, लवकरच किंमती मोडणार सर्व विक्रम? वायदे बाजारात उच्चांकी झेप, काय आहे आजचा भाव
सोने चांदीचा दर कायImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 5:33 PM

नवी दिल्ली : भारतीय वायदे बाजारात (Multi Commodity Exchange-MCX) आज सोने आणि चांदीच्या भावात जोरदार उसळी दिसून आली. वायदे बाजारात चांदीचा भाव आज 70,000 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक होता. मंगळवारी 3 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या भावात (Gold Price Today) 0.67 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. तर चांदीचा भाव (Silver price Today) आज 1.41 टक्क्यांनी वधारला. गेल्या व्यापारी सत्रात MCX वर सोन्याचा दर 0.28 टक्क्यांच्या वृद्धीसह बंद झाला होता. तर चांदीच्या भावात 0.21 टक्क्यांची वाढ झाली होती.

मंगळवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Rate Today) सकाळी 09:15 वाजता कालच्या भावापेक्षा 315 रुपयांनी वधारला. आज सोन्याचा भाव 55,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होता. त्यामुळे सोने येत्या काही दिवसात गरुड भरारी घेण्याची शक्यता आहे.

आज सुरुवातीच्या व्यापारी सत्रात भाव 55,280 रुपये होते. गेल्या व्यापारी सत्रात, म्हणजे काल MCX वर सोन्यात 156 रुपयांची वाढ दिसून आली. सोन्याचा भाव काल 55,170 रुपयांवर प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होता. त्यानंतर आज बाजार उघडला तेव्हा त्यात वाढ दिसून आली.

हे सुद्धा वाचा

मल्‍टी कमोडिटी एक्‍सचेंज (MCX) वर आज चांदीचा दर ही वधारला. चांदीचा भाव (Silver rate Today) 979 रुपयांनी वाढला आणि 70,550 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. चांदीचा आजचा भाव 69,850 रुपयांवर उघडला. त्यानंतर भाव 70,990 रुपयांपर्यंत वधारला.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीत तेजी दिसून आली. सोन्याचा आजच्या भावात 0.97 टक्क्यांची वाढ दिसून आली. सोने 1,841.39 डॉलर प्रति औस झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने आगेकूच केली. चांदीच्या भावात आज 1.68 टक्क्यांची वाढ होऊन ती 24.37 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होती.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मंगळवारी जोरदार वाढ दिसून आली. तर चांदीची किंमत घसरली. सोन्याच्या भावात 154 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,397 रुपये मोजावे लागले. तर काल सोन्याचा भाव 55,243 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीत प्रति किलो 17 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीचा भाव 69,831 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.