Gold Price Today News : शेअर बाजारासह रुपयाचा सोन्यावर परिणाम, काय आहे आजचे सोने-चांदीचे दर?

Gold Latest Rate News : डॉलरच्या तुलनेत रुपयात आज मामूली तेजी दिसून आली. शेअर बाजारात तेजी आहे. तर MCX वर सोन्याच्या किंमतीत मामूली तेंजी आहे तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

Gold Price Today News : शेअर बाजारासह रुपयाचा सोन्यावर परिणाम, काय आहे आजचे सोने-चांदीचे दर?
सोन्याचे दर वधरलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 1:14 PM

Gold Silver Price Today : डॉलरच्या तुलनेत रुपया (Rupee against Dollar) थोडा वधरला आणि शेअर बाजारातही (Share Market) आनंदाचे वातावरण आहे. आज वायदे बाजारात सकाळी 10:10 वाजता MCX वर ऑगस्ट डिलिव्हरी असलेल्या सोन्यात (Gold) 39 रुपयांची तेजी दिसून आली. सोने सकाळी 50496 रुपयांवर व्यापार करत होते. तर ऑक्टोबर डिलिव्हरी असलेल्या सोन्याच्या किंमतींनी 93 रुपयांची उसळी घेतली आणि सोने 50,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. चांदीमध्ये(Silver) आज थोडीशी घसरण दिसून आली. चांदीचा दर आज 56,400 रुपये प्रति किलो होता तर डिसेंबर डिलिव्हरी असलेल्या चांदीत 50 रुपयांची घसरण आली, चांदी 57,340 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करीत होती. तर सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. तर चांदी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार (HDFC Securities), देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात 15 रुपयांची वाढ होऊ सोन्याचा दर आज 50,581 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोमवारी हाच भाव 50,566 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीच्या किंमतीत घसरण झाली. चांदीच्या दरात 648 रुपयांची घसरण होऊन भाव 56,120 रुपये प्रति किलो झाले. सोमवारी चांदीचा भाव 56,768 रुपये प्रति किलो होते. (Gold Silver Rate News)

डॉलर इंडेक्समध्ये तेजीसत्र

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डमध्ये घसरण आली आहे. गेल्या तीन व्यावसायिक सत्रात सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. यावेळी स्पॉट गोल्ड 1723.65 डॉलर प्रति औस तर चांदी 18.87 डॉलर प्रति औस स्तरावर व्यापर करत आहे. डॉलर इंडेक्समध्ये तेजीचे सत्र आहे. सलग तिस-या दिवशी डॉलर निर्देशांक हिरव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. यावेळी हा निर्देशांक 108 च्या स्तरावर कामगिरी बजावत आहबे. जगभरातील सहा चलनात डॉलरची मजबूती या निर्देशांकातून दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

आज 999 शुद्ध सोन्याचा भाव काय?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध आह.त्यानुसार, 12 जुलै रोजी 999 शुद्ध सोने अर्थात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,878 रुपये होता. तर 995 शुद्ध सोन्याची किंमत 50,674 रुपये होती. 916 शुद्ध सोन्याचे दर 46,604 रुपये , तर 750 शुद्ध सोन्याच्या किंमती 38,159 रुपये, 585 शुद्ध सोन्याचे दर 29,764 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 चांदीची प्रति किलोग्रॅम किंमत 56,097 रुपये आहे.

शुद्ध सोन्याची ओळख अशी करा

सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.