Gold Silver Price Today : सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ, पाहा 10 ग्रॅम सोन्यासाठी आजचा दर….
सगल सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : सगल सहाव्या दिवशीही सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याच्या भाव 50 हजार 58 रुपये होता तर चांदीचा दर 68 हजार 590 प्रतिकिलो इतका होता. (gold-silver-price-today-on-29-12-2020-maharashtra-mumbai-pune-latest-rate-and-updates)
गुंतवणूकीसाठी सोने चांदी हे नेहमीच सुरक्षित समजले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली. याच गुंतवणूकदारांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून वधारायला सुरुवात झाली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारुन ते प्रति औंस 1875.61 डॉलरवर पोहोचले आहेत.
नागपूर
सोन्याचा दर- 49 हजार 210 प्रति तोळा चांदीचा दर- 68 हजार 900 प्रति किलो
पुणे
सोन्याचा दर- 51 हजार 700 प्रति तोळा चांदीचा दर 68 हजार प्रति किलो
जळगाव
सोन्याचा दर- 51 हजार 418 चांदीचा दर- 70 हजार 519
प्रतितोळा 63 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता
काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.
संबंधित बातम्या
Gold Silver Price Today: सोने आणि चांदी पुन्हा एकदा महागले, काय आहे तोळ्याचा भाव?