Gold-Silver Price Today | थर्टी फर्स्टला सोने खरेदीचा प्लान करताय? पाहा आजचा भाव

आजही सोन्याचा भाव वाढलेला आहे. जळगावात सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याच्या भाव 51 हजार 508 रुपये इतका आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे.

Gold-Silver Price Today | थर्टी फर्स्टला सोने खरेदीचा प्लान करताय? पाहा आजचा भाव
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 10:23 AM

मुंबई : सोन्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज 2020 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे (Gold-Silver Price Today). जर तुम्ही थर्टी फर्स्टला सोने-चांदी खरेदीचा प्लान करत असाल तर आजचे सोन्याचे भाव एकदा पाहून घ्या. आजही सोन्याचा भाव वाढलेला आहे. जळगावात सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याच्या भाव 51 हजार 508 रुपये इतका आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे. जळगावात चांदीचे दर 70,315 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत (Gold-Silver Price Today).

गेल्या चार दिवसांचा सोने-चांदीचा भाव

31 डिसेंबर

सोने – 51,508 रुपये प्रति तोळा चांदी – 70,315 रुपये प्रति किलो

30 डिसेंबर

सोने – 51,407 रुपये प्रति तोळा चांदी – 69,769 रुपये प्रति किलो

29 डिसेंबर

सोने – 51,418 रुपये प्रति तोळा चांदी -70,519 रुपये प्रति किलो

28 डिसेंबर

सोने – 51,707 रुपये प्रति तोळा चांदी – 71,367 रुपये प्रति किलो

मुंबईतील आजचा भाव

मुंबईत आज सोन्याचा दर 51,730 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

पुण्यात मात्र जळगाव, मुंबईपेक्षा सोन्याचा भाव कमी आहे. पुण्यात एक तोळा सोन्याचा भाव 49 हजार 940 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

कोल्हापुरातील सोने-चांदीचा भाव

तर कोल्हापुरातही सोन्याचा भाव मुंबईइतकाच आहे. कोल्हापुरात सोन्याच्या दराने 51 हजार प्रति तोळ्याचा भाव गाठला आहे. तर चांदीचा भाव 68 हजार रुपये प्रति किलो आहे (Gold-Silver Price Today).

प्रतितोळा 63 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

Gold-Silver Price Today

संबंधित बातम्या :

Gold Silver Price Today: सोने आणि चांदी पुन्हा एकदा महागले, काय आहे तोळ्याचा भाव?

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.