Gold Silver Rate Today 10 April 2024 : सराफा बाजारात दरवाढीचे तुफान; सोन्याचा टॉप गिअर, चांदीने घेतला ब्रेक
Gold Silver Rate Today 10 April 2024 : सोने आणि चांदीने आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत. गेल्या 10 वर्षांत या मौल्यवान धातूंनी दरवाढीचे सर्व टप्पे, विक्रम मोडीत काढले आहे. दरवाढीची गुढी उभारल्यानंतर चांदीने माघार घेतली तर सोन्यात उसळी दिसून आली. काय आहे सोने-चांदीचा भाव?
एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने जोरदार मुंसडी मारली. या दरवाढीने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. मार्चनंतर एप्रिल महिन्यात किंमतींनी रॉकेट भरारी घेतली. एप्रिलच्या दहा दिवसांत किंमती गगनाला भिडल्या. 1 एप्रिलपासून सोने 4,000 रुपयांनी तर चांदी 7,000 रुपयांनी महागली. मार्च महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांत पण मौल्यवान धातूंनी असाच कहर केला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात या दरवाढीला थोडा ब्रेक लागला होता. चढउताराचे सत्र होते. पण मार्च महिन्याच्या अखेरीस बेशकिंमती धातूंनी भाववाढीचा विक्रम केला होता. एप्रिल महिन्यातील दहा दिवसांत सोने आणि चांदीने असाच पराक्रम दाखवला. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 10 April 2024)
सोने पुन्हा उसळले
एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसांत सोन्याने जोरदार मुसंडी मारली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी वधारले. 2 एप्रिलला 250 रुपयांनी स्वस्त झाले. 3 एप्रिलला 750 रुपयांनी भाव वधारले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी सोने महागले. 5 एप्रिलला 450 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 6 एप्रिलला सोन्याने 1310 रुपयांची झेप घेतली. 7 एप्रिल रोजी भावात बदल झाला नाही. 8 एप्रिल रोजी 300 रुपयांनी किंमती महागल्या. 9 एप्रिल रोजी 110 रुपयांनी भाव वधारला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने घेतला ब्रेक
या महिन्यात चांदीने तुफान फटकेबाजी केली. या 10 दिवसांत चांदी 7 हजारांनी महागली. 1 एप्रिलला 600 रुपयांनी किंमती वधारल्या. 2 एप्रिल रोजी 400 रुपयांची दरवाढ झाली. 3 एप्रिल रोजी चांदीने 2 हजारांची मुसंडी मारली. 4 एप्रिल रोजी 1 हजारांनी चांदीने भरारी घेतली. 5 एप्रिल रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. 6 एप्रिल रोजी 1800 रुपयांची विक्रमी उडी चांदीने घेतली. त्यानंतर एक हजारांनी किंमती महागल्या. काल चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 71,832 रुपये, 23 कॅरेट 71544 रुपये, 22 कॅरेट सोने 65,798 रुपये झाले.18 कॅरेट 53,874 रुपये, 14 कॅरेट सोने 42,022 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,100 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.