Gold Silver Rate Today : Israel-Hamas युद्ध भडकले, सोने-चांदी महागले

Gold Silver Rate Today : Israel-Hamas War मुळे सोने-चांदी महागले आहे. युद्ध अजून भडकले आहे. इस्त्राईलने गाझा पट्टीत मोठा हल्ला चढवला आहे. गाझाची नाकाबंदी केली आहे. तर इकडे सोने-चांदीने मोठी मुसंडी मारली आहे. पितृपक्षामुळे ग्राहकांची बाजारात गर्दी नसली तर किंमती वधारल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

Gold Silver Rate Today : Israel-Hamas युद्ध भडकले, सोने-चांदी महागले
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 8:31 AM

नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास युद्ध (Israel-Palestine Conflict) भडकल्याने सोने-चांदी महागले आहे. मध्य-पूर्वेतील या युद्धाचा सर्वच ठिकाणी परिणाम दिसून येत आहे. भूराजकीय समीकरणं बदलली आहे. व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे. मोठ्या गुंतवणूकदारांनी पुन्हा सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. दोन्ही मौल्यवान धातूतील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. त्यामुळे मोठे संकट येण्याची चाहूल लागताच अनेक देशांच्या मध्यवर्ती बँके सोने खरेदीचा सपाटा लावतात. सोन्यातील गुंतवणूक वाढली की, मागणी -पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त होते आणि दरवाढ होते. शुक्रवारपासून सोने-चांदीने (Gold Silver Rate Today 12 October 2023) जोरदार मुसंडी मारली आहे. किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,860 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,628 रुपये, 22 कॅरेट सोने 53000 रुपये, 18 कॅरेट 43,395 रुपये, 14 कॅरेट सोने 33,848 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,494 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हे सुद्धा वाचा

असे महागले सोने

गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवारी हमासने इस्त्राईलवर हल्ला चढविल्यापासून किंमतींनी मोठी झेप घेतली. 6 ऑक्टोबर रोजी 70 रुपये, शनिवारी 310 रुपये, 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची, 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली. 11 ऑक्टोबर रोजी किंमती जैसे थे होत्या. 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीची उसळी

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला चांदीत पडझड झाली होती. युद्धानंतर चांदीत तेजीचे सत्र आले. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 11 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,100 रुपये आहे.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.