Gold Silver Rate Today : स्वातंत्र्यदिनी सोने-चांदीची आनंदवार्ता! इतके उतरले भाव

Gold Silver Rate Today : ग्राहकांना खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांना स्वातंत्र्यदिनी स्वस्तात सोने-चांदी खरेदी करता येईल. ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूला घरघर लागली आहे. किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची चांदी झाली आहे.

Gold Silver Rate Today : स्वातंत्र्यदिनी सोने-चांदीची आनंदवार्ता! इतके उतरले भाव
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 9:38 AM

नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) मोठी घसरण झाली. दोन्ही धातूंना या महिन्यात मोठी उडी घेता आली नाही. सोने थेट 58,000 रुपयांच्या घरात आले. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीत मोठी घसरण झाली होती. जुलै महिन्यात सोने-चांदीची घौडदौड झाली होती. ऑगस्ट महिन्यात किंमती सूसाट धावतील असा अंदाज होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र तीन महिन्यात दोन्ही धातूंना कोणताही नवीन विक्रम करता आला नाही. ऑगस्ट महिन्यात दोन आठवड्यात किंमतींना लगाम लागला. सोने-चांदीत सातत्याने घसरण होत आहे. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

सोन्यात मोठी घसरण

या महिन्यात दोन आठवड्यात सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. सोन्यामध्ये केवळ दोनदा वाढ झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर भावात सातत्याने घसरण होत आहे. शनिवार, रविवार आणि मंगळवारी राष्ट्रीय सुट्टी आल्याने भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केलेले नाही. गुडरिटर्न्सने सोने-चांदीचे भाव जाहीर केलेले आहे.

हे सुद्धा वाचा

डॉलरने केला रेकॉर्ड

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या उपाय योजनांना अनुकूल परिणाम दिसून आला. डॉलर गेल्या एका महिन्यात दुडूदुडू धावला. डॉलरमध्ये 0.3 टक्के वाढ झाली. तर सोन्यात तितकीच घसरण झाली. सोने-चांदी महिनाभरात निच्चांकावर पोहचले आहे.

सोन्याचा भाव काय

गेल्या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 250 रुपयांनी कमी झाले. 11 ऑगस्ट रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदी 5500 रुपयांची घसरण

ऑगस्ट महिन्यात चांदी स्वस्त झाली. चांदी 5500 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी चांदी घसरली. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी उतरली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. या किंमतीत 2100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,969 रुपये, 23 कॅरेट 58,733 रुपये, 22 कॅरेट सोने 54,016 रुपये, 18 कॅरेट 44,227 रुपये, 14 कॅरेट सोने 34,497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,211 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.