Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा ग्राहकांना ‘शॉक’! झरझर वाढले भाव

Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सलग तीन दिवस सोने-चांदीत पडझडीचे सत्र सुरु होते. पण गुरुवारी मौल्यवान धातूंनी गेल्या तीन दिवसांची कसर भरुन काढली. सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. ऐन लग्नसराईत सोने-चांदीचा हा युटर्न अनेकांसाठी धक्कादायक आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा ग्राहकांना 'शॉक'! झरझर वाढले भाव
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 9:12 AM

नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने ग्राहकांना शॉक दिला. या आठवड्यात सोने-चांदीत मोठी पडझड झाली. सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीची पण मोठी पिछेहाट झाली. सलग तीन दिवसांत भावात मोठी घसरण झाली. गुरुवारी मात्र सोने-चांदीचा नूर पालटला. मोठ्या पडझडीनंतर सोने-चांदीने युटर्न घेतला. दिवाळीपासून मौल्यवान धातूने मुसंडी मारली होती. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली होती. गेल्या आठवड्यात या दरवाढीला ब्रेक लागला. या आठवड्यात तीन दिवस भावात (Gold Silver Price Today 15 December 2023) मोठी घसरण झाली. गुरुवारी सोने-चांदी चांगलेच चमकले. दोन्ही धातूंमध्ये इतकी वाढ झाली.

सोन्याचे कमबॅक

या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले होते. गेल्या आठवड्यात पण मोठी घसरण झाली होती. पण गुरुवारी सोन्यात हजार रुपयांची उसळी आली. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. बुधवारी 13 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 2500 रुपयांची दरवाढ

या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3500 रुपयांची घसरण झाली होती. गुरुवारी चांदीत 2500 रुपयांची उसळी आली. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 13 डिसेंबर रोजी भाव 700 रुपयांनी उतरले होते. 14 डिसेंबर रोजी चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,396 रुपये, 23 कॅरेट 62,146 रुपये, 22 कॅरेट सोने 57,155 रुपये झाले. 18 कॅरेट 46,797 रुपये, 14 कॅरेट सोने 36,502 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,993 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.