AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची जोरदार फटकेबाजी, इतकी झाली दरवाढ

Gold Silver Rate Today : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीने मैदानावर तडाखेबंद फलंदाजी केली. तर गोलदांजीने नंतर किल्ला लढवला. त्याचप्रमाणे भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीने तुफान फटकेबाजी केली. दिवाळीच्या काळात दोन्ही धातूंनी भावफलक हलता ठेवला. खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची जोरदार फटकेबाजी, इतकी झाली दरवाढ
| Updated on: Nov 16, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीने सराफा बाजारात तुफान फटकेबाजी केली. बुधवारी उपांत्य फेरीत भारतीय फलंदाजांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला. तर इकडे सोने-चांदीने सराफा बाजार गाजवला. ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यात मौल्यवान धातूंनी मोठी मजल मारली. गेल्या दोन दिवसांत मोठी धावसंख्या उभारली. धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा या दिवशी दोन्ही धातूंनी मोठी उचल खाल्ली. इतर दिवशी भावात घसरण होती. या आठवड्यात एक दिवस घसरणीचा तर दोन दिवस दरवाढीचे होते. सोने-चांदीत (Gold Silver Price Today 16November 2023) या काळात मोठी दरवाढ झाली. इतके वधारले भाव…

सोन्याचा मोठी मजल

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीत घसरण झाल्याने ग्राहकांची चांदी झाली. त्यांना ऑक्टोबरच्या तुलनेत स्वस्तात सोने खरेदी करता आले. गेल्या आठवड्यात पण सोन्यात चांगलीच घसरण झाली होती. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2300 रुपयांची उसळी

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. या आठवड्यात सोमवारी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 16 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्याचा दावा गुडरिटर्न्सने केला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,618 रुपये, 23 कॅरेट 60,375 रुपये, 22 कॅरेट सोने 55,526 रुपये झाले. 18 कॅरेट 45,464 रुपये, 14 कॅरेट सोने 35,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 72,220 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.