Gold Silver Rate Today 17 May 2024 : ग्राहकांनी सराफा बाजारात यावं की नाही? सोने-चांदी एकदम सूसाट

Gold Silver Rate Today 17 May 2024 : गेल्या आठवड्याप्रमाणे सोने आणि चांदीने या आठवड्यात हनुमान उडी घेतली. दोनच दिवसांत मौल्यवान धातूंच्या या विक्रमी उडीने ग्राहकांचा मूड मात्र बिघडला. सराफा बाजाराकडे वळालेली अनेकांची पावलं थबकली.

Gold Silver Rate Today 17 May 2024 : ग्राहकांनी सराफा बाजारात यावं की नाही? सोने-चांदी एकदम सूसाट
सोने-चांदीची काय खबरबात
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 8:36 AM

सोने आणि चांदीने पुन्हा दरवाढीचा गिअर टाकला. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मौल्यावान धातूने अखेरच्या सत्रात जोरदार मुसंडी मारली. दोन दिवसांत बेशकिंमती धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. खरेदीचा नूर पार बदलला. सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीमुळे जादा पैसा मोजावा लागणार आहे. मार्च आणि एप्रिलनंतर मेमध्ये अजून दोन्ही धातूंनी विक्रम नावावर नोंदवला नाही. पण दर आठवड्याला दोन्ही धातूंची आगेकूच सुरुच आहे. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 17 May 2024 ) जाणून घ्या.

सोन्याची मुसंडी

गेल्या आठवड्यात अक्षय तृतीयेला सोने जोरदार उसळले होते. या आठवड्याची सुरुवात पडझडीने झाली होती. 13 मे रोजी सोने 100 रुपयांनी तर14 मे रोजी किंमती 400 रुपयांनी उतरल्या. 15 मे रोजी त्यात तितकीच वाढ दिसली. 16 मे रोजी त्यात 770 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 2600 रुपयांची वाढ

अक्षय तृतीयेला चांदीने मुसंडी मारली होती. या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त तर 14 मे रोजी 700 रुपयांनी वधारली. बुधवारी 15 मे रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 16 मे रोजी 1500 रुपयांनी किंमती वाढल्या. तीन दिवसांत चांदीने 2600 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने हनुमान उडी घेतली. 24 कॅरेट सोने 73,438 रुपये, 23 कॅरेट 73,144 रुपये, 22 कॅरेट सोने 67,269 रुपये झाले. 18 कॅरेट 55,079 रुपये, 14 कॅरेट सोने 42,961रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,230 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.