Gold Silver Rate Today 18 October 2024 : चांदी सुस्तावली, तर सोन्याची जोरदार फटकेबाजी, तीनच दिवसात इतक्या वधारल्या किंमती, सणासुदीत ग्राहकांना फटका

Gold Silver Rate Today 18 October 2024 : चांदीत गेल्या काही दिवसांपासून मोठी उलाढाल नसली तरी सोन्याने जोरदार फटकेबाजी केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले.

Gold Silver Rate Today 18 October 2024 : चांदी सुस्तावली, तर सोन्याची जोरदार फटकेबाजी, तीनच दिवसात इतक्या वधारल्या किंमती, सणासुदीत ग्राहकांना फटका
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 8:36 AM

गेल्या काही दिवसांपासून चांदीचा सूर हरवला आहे. चांदी मोठी उडी घेण्यासाठी चाचपडत आहे. तर सोन्याने गेल्या काही दिवसांपासून दमदार बॅटिंग केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. सणासुदीत आणि निवडणुकीच्या धामधुमीत दोन्ही धातु मोठी मजल मारणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता सोने आणि चांदीची अशी आहे किंमत? (Gold Silver Price Today 18 October 2024 )

तीनच दिवसात सोन्याची मोठी झेप

दिवाळीपूर्वी सोने 80 हजारांच्या घरात जाते की काय अशी स्थिती आहे. जागतिक युद्धाचा परिणाम, चीनकडे गुंतवणूकदारांचा वळालेला मोर्चा आणि भारतीय बाजारपेठेत सणासुदीच्या तडक्यामुळे हा पिवळा धातु वधारला आहे. 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. 17 सप्टेंबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर आज सकाळच्या सत्रात ही या धातुची दमदार आगेकूच दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीला गवसेना सूर

गेल्या 20 दिवसांत चांदीत मोठी अपडेट दिसली नाही. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी महागली. या आठवड्यात चांदीची कोणतीही खबरबात समोर आलेली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,810, 23 कॅरेट 76,502, 22 कॅरेट सोने 70,358 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,608 रुपये, 14 कॅरेट सोने 44,934रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,600 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.