AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 November 2024 : सोन्याची उसळी, चांदीची घसरगुंडी, आता काय आहेत भाव तरी?

Gold Silver Rate Today 19 November 2024 : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीला सूर गवसला नाही. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने चढाई केली. पण चांदीत नरमाई आली. आता अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती?

Gold Silver Rate Today 19 November 2024 : सोन्याची उसळी, चांदीची घसरगुंडी, आता काय आहेत भाव तरी?
मध्यंतरी घसरण झालेल्या सोने भावात चार दिवसांपासून वाढ होत गेली. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ७७ हजार ७०० रुपयांवर सोने गेले. सोन्याचे दर एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन ७७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
| Updated on: Nov 19, 2024 | 8:32 AM
Share

या आठवड्यात सोन्याने मोठी उसळी घेतली. तर चांदीने नरमाईचा सूर आळवला. गेल्या 15 दिवसांत सोने 6 हजारांच्या घरात तर चांदी 11 हजारांनी स्वस्त झाली होती. गेल्या आठवड्यात सोन्यात 1300 रुपयांची तर चांदीत 5 हजारांची घसरण नोंदवण्यात आली. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने सराफा बाजारात मोठी गर्दी उसळली. जागतिक बाजारात अमेरिकेतील सत्ता बदलाचा परिणाम दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प लवकरच व्यापारी धोरणात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आता दिसून येईल. या आठवड्यात सोन्याने 600 रुपयांची झेप घेतली तर चांदीत कुठलाही बदल दिसला नाही.  सराफा बाजारात अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 19 November 2024 )

सोन्यात दरवाढ

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 1300 रुपयांनी उतरली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 660 रुपयांनी महागले. सोमवारी सोन्याने उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा मौल्यवान धातुत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,010 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण

गेल्या दोन आठवड्यात चांदीला मोठी मजल मारता आली नाही. चांदी गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,808, 23 कॅरेट 74,508, 22 कॅरेट सोने 68,524 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,106 रुपये, 14 कॅरेट सोने 43,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,289 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.