AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सणासुदीत ग्राहकांचा हिरमोड! सोने-चांदी सूसाट

Gold Silver Rate Today : सणासुदीत ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. सोने-चांदीने उसंत न घेता भराभर दरवाढीचे सत्र आरंभल्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Gold Silver Rate Today : सणासुदीत ग्राहकांचा हिरमोड! सोने-चांदी सूसाट
Image Credit source: गुगल
| Updated on: Sep 20, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : घडीभर उसंत न घेता सोने-चांदीने (Gold Silver Price Today 20 September 2023) मुसंडी मारली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंनी सलग पाचव्या दिवशी पण धावफलक हालता ठेवला. बऱ्याच कालावधीनंतर सोने-चांदी तब्येतीने मैदानावर टिकून आहेत. दमदार बॅटिंगच्या जोरावर त्यांनी धावफलकावरील आकडे उंचावले आहेत. 15 सप्टेंबरपासून सोन्याने मोठी धावसंख्या उभारली आहे. सोन्याला चांदीची पण साथ मिळाल्याने दोन्ही धातूंनी कमाल केली आहे. सराफा बाजारात गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांचा खिसा चांगला खाली झाली. त्यांना गेल्या आठवड्यापेक्षा अधिक खर्च करावा लागला. जागतिक परिमाणं मोडीत काढत सोने-चांदीने धुमाकूळ घातला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात दोन्ही धातूंनी अशीच बॅटिंग केली होती. सोने-चांदीत गेल्या पाच दिवसांत इतकी दरवाढ झाली आहे.

सोन्याची जोरदार कामगिरी

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याची सुरुवात अडखळत झाली. पंधरा दिवसांत घसरणीच्या सत्राने भाव कमी झाले होते. शुक्रवारी 15 सप्टेंबरला सोन्याने पहिल्यांदा त्याला खिंडार पाडले. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. या पाच दिवसांत 700 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 55350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीत 1000 रुपयांची वाढ

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. गेल्या पंधरा दिवसांत चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची दरवाढ झाली. तर 18 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 19 सप्टेंबररोजी चांदीने 300 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,324 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,086 रुपये, 22 कॅरेट सोने 54341 रुपये, 18 कॅरेट 44,493 रुपये, 14 कॅरेट सोने 34,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,212 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.