Gold Silver Rate Today : सोने-चांदीची चाल काय; किंमतीत झाली इतकी वाढ

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात दरवाढीची आघाडी उघडली. पण मौल्यवान धातूंना मोठा पल्ला गाठता आला नाही. किंमतीत मोठी वाढ होईल, असा अंदाज चुकला. या काळात सोने 500 रुपयांनी तर चांदी 1700 रुपयांनी वधारली. आज दोन्ही धातू भरारी घेतात की माघार घेतात यावर या आठवड्यातील घौडदौड दिसून येईल.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची चाल काय; किंमतीत झाली इतकी वाढ
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 8:25 AM

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : सर्वसामान्य ग्राहकांना या आठवड्यात सोने-चांदीने दिलासा दिला. किंमतीत मोठी वृद्धी झाली नाही. दिवाळीपासून मौल्यवान धातूत दरवाढीचे सत्र सुरु होते. सोने-चांदीने दोन आठवड्यापूर्वी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. नवीन विक्रम नावावर नोंदवले. या काळात सोने 65,000 हजारांच्या पुढे तर चांदी 80 हजारांच्या आसपास पोहचली होती. ग्राहकांच्या खरेदीचा उत्साह मावळला. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत घसरण झाली. तर या आठवड्यात घसरण झाली नाही. पण मोठी दरवाढ पण झाली नाही. या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 1700 रुपयांनी वधारली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 22 December 2023)

सोन्याचा भाव वधारला

गेल्या आठवड्यात सोने 1100 रुपयांनी महाग झाले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 18 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची झेप घेतली. काल किंमती अपडेट झाल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची 1700 रुपयांची झेप

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. यापूर्वी चांदी 3500 रुपयांनी महागली. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी चांदीत 700 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,335 रुपये, 23 कॅरेट 62,086 रुपये, 22 कॅरेट सोने 57,098 रुपये झाले. 18 कॅरेट 46,751 रुपये, 14 कॅरेट सोने 36,466 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,550 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.