Gold Silver Rate Today 22 October 2024 : सोने 80 हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी देणार लाखाची सलामी; आता काय आहेत भाव तरी?
Gold Silver Rate Today 22 October 2024 : मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीने दमदार खेळी केली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे हात पोळले असले तरी मौल्यवान धातुनी त्यांना मालामाल केले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांची पावलं पुन्हा या बेशकिंमती धातुकडे वळली आहेत. दोन्ही धातु नवीन विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत.
दिवाळीपूर्वीच मौल्यवान धातुनी धमाका केला आहे. मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीने दमदार कामगिरी बजावली. शेअर बाजारात चढउताराचे सत्र आहे. त्यात गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला. तर इकडे सराफा बाजारात गुंतवणूकदार अवघ्या महिन्याभरातच मालामाल झाले आहेत. जानेवारी महिन्यात मौल्यवान धातुत गुंतवणूक करणाऱ्यांना आता सोन्यासारखा परतावा मिळाला आहे. त्यांची चांदी झाली आहे. सोने आता 80 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. तर चांदी लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. दोन्ही धातुची दमदार खेळी सुरू आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 22 October 2024 )
सोने 80 हजारांच्या उंबरठ्यावर
गेल्या आठवड्यात सोन्याने 1600 रुपयांच्या दरवाढीचा गिअर टाकला होता. एकदाच 15 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी भाव उतरले होते. तर 18 ऑक्टोबरला 870 रुपयांची मुसंडी सोन्याने मारली होती. या आठवड्यात 21 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी महागले. तर आज सकाळच्या सत्रात त्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा
गेल्या काही दिवसांपासून सुस्तावलेल्या चांदीला अचानक तेजीचे स्वप्न पडले. गेल्या आठवड्यात चांदीने मोठा पल्ला गाठला होती. तीन हजार रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. तर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 21 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची मजल मारली. गुडरिटर्न्सवरील आकडेवारीनुसार आता चांदीने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या दरवाढीमुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,214, 23 कॅरेट 77,901, 22 कॅरेट सोने 71,644 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,661रुपये, 14 कॅरेट सोने 45,755 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,254 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.