AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 24 April 2024 : खरेदीला चला बिगी बिगी; सोने-चांदी तोंडावर आपटले, असा झाला फायदा

Gold Silver Rate Today 24 April 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून सोने आणि चांदीची धुवांधार बॅटिंग सुरु आहे. त्यातच इराण आणि इस्त्राईलमध्ये तणाव वाढल्याने मौल्यवान धातूच्या किंमतींनी मोठी झेप घेतली. मार्च आणि एप्रिलने ग्राहकांची झोप उडवली. दोन दिवसांत बेशकिंमती धातूत मोठी पडझड झाली.

Gold Silver Rate Today 24 April 2024 : खरेदीला चला बिगी बिगी; सोने-चांदी तोंडावर आपटले, असा झाला फायदा
सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता
| Updated on: Apr 24, 2024 | 8:37 AM
Share

ऐन उन्हाळ्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा घाम फोडला. मार्चपासून मौल्यवान धातूने दरवाढीची मोठी आघाडी उघडली. त्यात एप्रिलमध्ये तर यापूर्वीचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड या बेशकिंमती धातूंनी अगदी गुंडाळून ठेवले. एप्रिल महिन्यात Iran-Israel संघर्ष उडाला. त्यामुळे सोने आणि चांदीने पुन्हा नवीन रेकॉर्ड केला. देशातील स्थानिक बाजारात जीएसटी सोने 76,000 रुपयांच्या घरात पोहचले. या दोन देशात युद्धाचा भडका उडाला नसला तरी चीनमधील ग्राहकांनी मौल्यवान धातूच्या खरेदीसाठी झुंबड केल्याने जागतिक बाजारात या धातूच्या किंमती वधारल्या आहेत. काय आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 24 April 2024)

सोन्यात मोठी घसरण

मार्च महिन्यानंतर एप्रिलमध्ये सोन्याने मुंसडी मारली. मागील आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी वधारले तर 430 रुपयांनी उतरले होते. या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोमवारी सोने 550 रुपयांनी उतरले. तर मंगळवारी 1530 रुपयांनी सोने आपटले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी पडझड

गेल्या आठवड्यापासून चांदीने ग्राहकांची चांदी केली. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किंमती जैसे थे होत्या. या सोमवारी चांदीतील हे नरमाईचे धोरण सुरुच आहे. सोमवारी चांदीत 1 हजारांची स्वस्ताई आली. तर मंगळवारी चांदी 2500 रुपयांनी सपाटून आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,598 रुपये, 23 कॅरेट 71,311 रुपये, 22 कॅरेट सोने 65,584 रुपये झाले. 18 कॅरेट 53,699 रुपये, 14 कॅरेट सोने 41,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,007 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.