Gold Silver Rate Today : सोने-चांदी लवकरच गगनाला भिडणार, असा रेकॉर्ड तुटणार
Gold Silver Rate Today : सोने-चांदी मे महिन्यातील रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी तर हा विक्रम अवघ्या 30 रुपयांच्या फरकावर होता. सोने-चांदीने गेल्या 15 दिवसांत मोठी झेप घेतली. दिवाळीपासून मौल्यवान धातूंनी सातत्याने आगेकूच केली आहे. या महिन्यात सोने-चांदी रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार, बुधवारी सोन्याच्या किंमतीत 366 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी 61,616 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. या वर्षी 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडायला सोन्याला आता अधिक वेळ लागणार नाही. सोन्याला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 30 रुपयांची आवश्यकता होती. चांदी पण लवकरच त्याचा यापूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. दिवाळीपासून सोने-चांदीने (Gold Silver Price Today 24 November 2023) मोठी भरारी घेतली. गेल्या आठवड्यात सोन्यात 1500 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 4600 रुपयांची आगेकूच केली. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.
सोन्यात किंचित घसरण
गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली. 21 नोव्हेंबर रोजी भाव 380 रुपयांनी वाढले. 22 नोव्हेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 23 नोव्हेंबर रोजी 50 रुपयांनी भाव घसरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
10 दिवसांत 4600 रुपयांची दरवाढ
13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची भरारी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक लागला. पण 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,394 रुपये, 23 कॅरेट 61,148 रुपये, 22 कॅरेट सोने 56,237 रुपये झाले. 18 कॅरेट 46,046 रुपये, 14 कॅरेट सोने 35,916 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,065 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.