Gold Silver Rate Today : सोन्याने पुन्हा दाखवला दम, चांदीत मात्र नरमाई, काय आहेत आजचे दर

Gold Silver Rate Today : सोन्याने अखेर दमखम दाखवला. अनेक दिवसांपासून पडझडीचे सत्र सुरु होते. पण त्याला ब्रेक लागला. चांदीला मात्र दम लागला. गेल्या चार दिवसांपासून चांदीत मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या काय आहेत दर

Gold Silver Rate Today : सोन्याने पुन्हा दाखवला दम, चांदीत मात्र नरमाई, काय आहेत आजचे दर
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 9:17 AM

नवी दिल्ली : दहा दिवसानंतर सोन्याने पुन्हा एकदा दम दाखवला. 16, 17 जून रोजी सोन्यात 410 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर सोन्यात पडझड झाली. गेल्या मे महिन्यापासून सोन्यात सातत्याने घसरण सुरु आहे. भाव आपटले. सोन्यात गेल्या दहा दिवसांत जवळपास 1100 रुपयांची घसरण झाली. भाव निच्चांकावर पोहचले. चांदीत मात्र आपटी बार सुरुच आहे. किंमती जवळपास 3000 रुपयांनी उतरल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने उच्चांक गाठला होता. नवीन विक्रम नोंदवले होते. पण मे पासून ओहोटी लागली आहे. आता जागतिक केंद्रीय बँका व्याजदर वाढविण्याची शक्यता पाहता, सोने-चांदीवर (Gold Silver Rate Today) दबाव येण्याची दाट शक्यता आहे. जाणून घ्या सोने-चांदीचा भाव..

शनिवार-रविवार भाव नाही इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (ibjarates.com) शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीचे भाव जाहीर करत नाही. त्यामुळे या फर्मकडून आज देशभरात सोने-चांदीचे भाव जाहीर करण्यात येत नाही.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी, 23 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,395 रुपये, 23 कॅरेट 58,161 रुपये, 22 कॅरेट सोने 53,490 रुपये, 18 कॅरेट 43,796 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 68,304 रुपये होता. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हे सुद्धा वाचा

आठवड्यात उतरले झरझर शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. 22 कॅरेट सोन्यात 150 रुपयांची वाढ झाली. हा भाव प्रति 10 ग्रॅम 54,400 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोने 160 रुपयांनी वधारले. भाव 59,330 रुपयांवर पोहचले. गुरुवारी संध्याकाळी भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. शुक्रवारी 430 रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी संध्याकाळी हा भाव 59,170 रुपये होता. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

चांदीत 3000 रुपयांची घसरण या आठवड्यात चांदीचे अवसान गळाले. 19 जून रोजी चांदीत मोठा बदल झाला नाही. 20 जून रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 21, 22 आणि 23 जून रोजी भावात 2500 रुपयांची घसरण झाली. अनुक्रमे 1000,1000आणि 500 रुपयांची घसरण दिसून आली. 24 जून रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 400 रुपयांनी पडझड झाली. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.