Gold Silver Rate Today 26 June 2024 : ग्राहकांसाठी सुवार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, खरेदीची करा लगबग

Gold Silver Rate Today 26 June 2024 : गेल्या दोन आठवड्याचा रतीब या आठवड्यातही कायम आहेत. तीन दिवसांत सोने-चांदीत मोठी उठाठेव झालेली नाही. 22 जून रोजी किंमतीत पडझड झाली होती. त्यानंतर भाव वधारलेले नाहीत. काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 26 June 2024 : ग्राहकांसाठी सुवार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, खरेदीची करा लगबग
सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 8:34 AM

जून महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या महिन्यात दरवाढीचा कोणताही नवीन रेकॉर्ड मौल्यवान धातूंनी केला नाही. मागील दोन आठवड्यात सुरुवातीला भावात घसरण तर अखेरच्या टप्प्यात चढउताराचे सत्र असा रतीब, ट्रेंड सुरु आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती आहे. किंमतीत घसरण झाली आहे. मौल्यवान धातूंना कमाल दाखविता आलेली नाही. गेल्या आठवड्यात 22 जून रोजी सोने आणि चांदी दणकावून आपटले होते. त्यानंतर किंमतीत मोठा बदल झालेला नाही. काय आहेत आता भाव? (Gold Silver Price Today 26 June 2024 )

सोन्यात नरमाई

गेल्या आठवड्यात सोन्याने 21 जूनला 810 रुपयांची उसळी घेतली. तर 22 जून रोजी किंमती 870 रुपयांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात 24 जून रोजी किंमतीत 150 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी भाव स्थिर होता. बुधवारी सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 1000 रुपयांची घसरण

गेल्या आठवड्यात अखरेच्या सत्रात चांदीत 3000 रुपयांची वाढ झाली नि दुसर्‍या दिवशी 2000 रुपयांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला 24 जून रोजी चांदी 300 तर 25 जून रोजी 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांची घसरण झाली. बुधवारी सकाळच्या सत्रात चांदी 100 रुपयांनी उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,739 रुपये, 23 कॅरेट 71,452 रुपये, 22 कॅरेट सोने 65,713 रुपये झाले. 18 कॅरेट 53,804 रुपये, 14 कॅरेट सोने 41,967 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,515रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....