Gold Silver Rate Today 26 September 2024 : तीन दिवसांत तुफान घौडदौड, 10 ग्रॅम सोन्यासाठी खिसा खाली करा, तर चांदीसाठी हवी नोटांची गड्डी 

Gold Silver Rate Today 26 September 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने दमदार बॅटिंग केली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला नरमाई आणि नंतर उसळी घेतली होती. तर या तीन दिवसांत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतली आहे. काय आहेत आता मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 26 September 2024 : तीन दिवसांत तुफान घौडदौड, 10 ग्रॅम सोन्यासाठी खिसा खाली करा, तर चांदीसाठी हवी नोटांची गड्डी 
सोने-चांदीचा भाव काय?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 8:38 AM

पितृपक्षात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम किंमतींवर झाला. मौल्यवान धातूच्या किंमतीत दमदार बॅटिंग दिसली. या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोन्याने हजार रुपयांची तर चांदीने 2 हजार रुपयांची जोरदार मुसंडी मारली. पितृपक्षात ग्राहक खरेदी टाळणे पसंत करतात. सणासुदीचा काळा आणि लग्नाचा हंगाम यामुळे मौल्यवान धातूत तुफान येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. काय आहेत आता सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 26 September 2024 )

सोन्याची तुफान घौडदौड

गेल्या आठवड्यात सोने 800 रुपयांच्या घरात वधारले होते. तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोन्याने हजार रुपयांची भरारी घेतली. 23 सप्टेंबर रोजी किंमती 220 रुपयांनी वधारल्या. मंगळवारी भाव 210 रुपयांन तर 25 सप्टेंबर रोजी दर 660 रुपयांनी वाढला. आज सकाळच्या सत्रात पण या धातूत दरवाढीची शक्यता आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची तुफान बॅटिंग

चांदीने मध्यंतरी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दमदार बॅटिंग केली आहे. गेल्या आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी महागली होती. या आठवड्यात दोन दिवस किंमती स्थिर होत्या. तर बुधवारी 25 सप्टेंबर रोजी चांदीने दोन हजारांची उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात चांदीत कमाल वाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,248, 23 कॅरेट 74,947, 22 कॅरेट सोने 68,927 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,436 रुपये, 14 कॅरेट सोने 44,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,730 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.