Gold Silver Rate Today : खरेदीचा सोडू नका मौका, सोने-चांदीत मोठी घसरण
Gold Silver Rate Today : दबाव असतानाही या महिन्यात सोने-चांदीने पाच दिवस भावफलक हलता ठेवला. दबावाचा रेटा झुगारुन देत उसळी घेतली. गेल्या आठवड्यात वर्तवलेल्या अंदाजानुसार जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोने-चांदीला मोठी उसळी घेणे अवघड गेले. दोन्ही मौल्यवान धातूमध्ये घसरण झाली.
नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीला गेल्या दोन महिन्यात मोठी उसळी घेता आलेली नाही. एप्रिल महिन्यानंतर जुलै महिन्यात मौल्यवान धातूंनी चांगली कामगिरी बजावली होती. त्यावेळी खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीला एकदम चमकदार कामगिरी बजावता आली नाही. दहा दिवसांपूर्वी जागतिक बाजारात दोन्ही धातूंमध्ये घसरण तर आशिया बाजारात किंमतीत वाढ दिसून आली होती. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात किंमती वधारणे स्वाभाविक होते. त्यानुसार पाच दिवस सोने-चांदीने आगेकूच केली. सोन्यात 700 रुपयांची दरवाढ झाली तर चांदीमध्ये 1200 रुपयांपर्यंत उसळी आली. या आठवड्यात अद्याप दोन्ही धातूंना सूर गवसला नाही. सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today 27 September 2023) इतकी घसरण झाली.
इतकी झाली घसरण
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याने भरारी घेता आली नाही. घसरणीच्या सत्रानंतर 15 आणि 16 सप्टेंबर रोजी प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी उसळले. 19 सप्टेंबर रोजी सोन्यात 150 रुपयांची वाढ झाली. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या. 22 सप्टेंबर रोजी किंचित घसरण आली. 23 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. 24, 25 सप्टेंबर रोजी दर जैसे थे होते. 26 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 22 कॅरेट सोने 54900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,880 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
आता एक हजारांची घसरण
सप्टेंबर महिन्यात चांदीला सूर सापडला नाही. सुरुवातीलाच चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली.22 सप्टेंबर रोज चांदी एक हजारांची वधारली. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांची उसळी घेतली. यापूर्वी 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 24 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. आता 26 सप्टेंबर रोजी चांदीत एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 58,933 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,697 रुपये, 22 कॅरेट सोने 53,983 रुपये, 18 कॅरेट 44,200 रुपये, 14 कॅरेट सोने 34,476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,557 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.