Gold Silver Rate Today : खरेदीदारांचे नशीब चमकले, सोने-चांदी दणकावून आपटले
Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या घौडदोडीला पुन्हा ब्रेक लागला. जागतिक बाजारात चढाई सुरु होती. पण भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दणकावून आपटले. खरेदीदारांना स्वस्तात खरेदीची संधी मिळाली.
नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : जागतिक बाजारात सोने-चांदीची चढाई सुरु होती. भारतीय सराफा बाजारात मात्र दोन्ही धातू दणकावून आपटली. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलले. या महिन्यात दोन्ही धातूंनी भारतीय बाजारात आगेकूच केली. 20 जुलैपर्यंत दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र होते. 21 जुलैपासून भावात घसरण झाली. सोन्यात 1000 रुपयांची हजारांची तर चांदीत 2,000 रुपयांची घसरण झाली. आता दोन दिवस सोने-चांदीने (Gold Silver Price Today) पुन्हा उचल खाल्ली होती. सोने 500 रुपयांनी वधारले. तर चांदीने एक हजाराने झेप घेतली. 28 जुलै रोजी सोन्यात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीत 2000 रुपयांची पडझड झाली.
घसरणीचे सत्र
- 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
- 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
- 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
- 25 जुलै रोजी 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
- 28 जुलै रोजी जवळपास 400 रुपयांनी दर घसरले.
- 22 कॅरेट सोने 55,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60260 रुपये प्रति 10 ग्रॅम
- गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
चांदीत पडझड
गुडरिटर्न्सनुसार, चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. 28 जुलै रोजी 2000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,491 रुपये, 23 कॅरेट 59,253 रुपये, 22 कॅरेट सोने 54,494 रुपये, 18 कॅरेट 44,618 रुपये, 14 कॅरेट सोने 34,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,420 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
गेल्या 6 वर्षांत मागणीत घसरण
सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.