AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीत मोठी घसरण

Gold Silver Rate Today : सोने-चांदी खरेदीदारांना सुवर्णसंधी आहे. जागतिक बाजारातील दबावामुळे दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. महिन्यातील तिसऱ्या दिवशी भाव दणकावून आपटले आहे.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीत मोठी घसरण
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 9:42 AM

नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : सोने-चांदीने (Gold Silver Price Today) जुलै महिन्यात आघाडी घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण दोन्ही धातूंना मोठी मजल मारता आली नाही. मे आणि जून नंतर जुलै महिन्यात पण सोने-चांदीला नवीन रेकॉर्ड करता आला नाही. जुलै महिन्यात किंमतींनी मोठी उसळी घेतली. पण दोन्ही धातूंना विक्रमाला गवसणी घालता आली नाही. 21 जुलैपासून भावात घसरण झाली. जुलैच्या शेवटी सोन्यात जवळपास 1400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीत 2000 रुपयांची पडझड झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भाव वधारला होता. सोने 150 रुपयांनी तर चांदीने 1000 रुपयांची दरवाढ झाली होती. अमेरिकन बाजारात डॉलर मजबूत झाला. त्याचा परिणाम दिसून आला.

डॉलर मजबूत स्थितीत

अमेरिकन फेडरल बँकेने, गेल्या महिन्याच्या शेवटी व्याजदरात वाढ केली. कामगार निर्देशांक, महागाई निर्देशांक यांच्या घडामोडीमुळे डॉलर मजबूत स्थितीत पोहचला आहे. जागतिक बाजारात डॉलर मजबूत स्थितीत आल्याने सोने-चांदीचे मार्केट डाऊन झाले.

हे सुद्धा वाचा

महिन्याच्या सुरुवातीला चढउतार

गेल्या महिन्यात अनेक दिवस सोने-चांदी वधारलेले होते. तर जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही धातूत मोठी पडझड झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. तर 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60260 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

उसळी नंतर चांदी घसरली

जुलै महिन्यात चांदीत पडझड झाली असली तरी अनेकदा किंमतींमध्ये वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली होती. पण किंमती दुसऱ्या दिवशी पुन्हा घसरल्या. किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 77,300 रुपयांवर आला.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,616 रुपये, 23 कॅरेट 59,377 रुपये, 22 कॅरेट सोने 54,608 रुपये, 18 कॅरेट 44,712 रुपये, 14 कॅरेट सोने 34,875 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,273 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....