Gold Silver Rate Today 30 August 2024 : झापुक झुपुक, सोने-चांदीचा भाव उतरल्याने ग्राहक खुळवलं, सराफा बाजारात गर्दीचा हंगाम

Gold Silver Rate Today 30 August 2024 : गेल्या आठवड्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या 15 दिवसांत दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. दरवाढ झाली मात्र त्यानंतर घसरणीचे सत्र आले. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 30 August 2024 : झापुक झुपुक, सोने-चांदीचा भाव उतरल्याने ग्राहक खुळवलं, सराफा बाजारात गर्दीचा हंगाम
सोने चांदी भाव
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 8:33 AM

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ग्राहकांना मौल्यवान धातूंनी मोठा दिलासा दिला. त्यांच्या खिशाला जास्त झळ बसली नाही. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूत एकदाच घसरण नोंदवण्यात आली होती. तर या आठवड्यात मोठी उलाढाल दिसली नाही. किंमती स्थिर होत्या. या आठवड्यात सोने आणि चांदीला मोठी मजल मारता न आल्याने ग्राहकांची पावले आपोआप सणासुदीच्या तोंडावर सराफा बाजाराकडे वळली. आता काय आहेत दोन्ही धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 30 August 2024 )

सोन्यात आली नरमाई

या आठवड्यात सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत बदल दिसला नाही. 27 ऑगस्टला सोने उतरले. 28 ऑगस्ट रोजी सोने 220 रुपयांनी वधारले. 29 ऑगस्ट रोजी भाव स्थिर होता. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने घेतली सक्तीची विश्रांती

गेल्या दोन आठवड्यात चांदीला मोठा पल्ला गाठता आला नाही. गेल्या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी 1 हजार रुपयांनी तर या आठवड्यात 27 ऑगस्ट रोजी चांदी 600 रुपयांनी वधारली. इतर दिवशी एक तर भाव स्थिर राहिला अथवा त्यात घसरण झाली.26 ऑगस्ट रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी किंमती स्थिर होत्या. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली. 24 कॅरेट सोने 72,001, 23 कॅरेट 71,713, 22 कॅरेट सोने 65,953 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,001 रुपये, 14 कॅरेट सोने 42,121 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,072 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.