सोने एकदम सूसाट, आठवड्याच्या अखेरीस चांदीचा षटकार, अशा वाढल्या किंमती

Gold Silver Rate Today 30 March 2024 | जागतिक घडामोडींमुळे सोन्यासह आणि चांदीचा भाव सूसाट आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने काल 70 हजारांच्या घरात पोहचले होते. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारीच हा भाव ओलांडल्या गेला होता. गुडरिटर्न्सने तर भाव 1500 रुपयांनी वधारल्याचा दावा केला आहे.

सोने एकदम सूसाट, आठवड्याच्या अखेरीस चांदीचा षटकार, अशा वाढल्या किंमती
सोन्याची मुसंडी, चांदी पण तळपली
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 8:39 AM

मार्च महिन्यात उन्हाचा पारा वाढला, त्याहून सोने आणि चांदी अधिक तळपले. सोने आणि चांदीच्या किंमती एकदम वधारल्या. या महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वधारले. तर दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी महागली होती. मध्यंतरी दोन्ही धातूंनी ब्रेक घेतला. त्यानंतर 21 मार्च रोजी सोन्याने मुसंडी मारली. तर चांदीने पण आगेकूच केली. या आठवड्यात नरमाई असलेल्या मौल्यवान धातूंनी आठवड्याच्या अखेरीस मोठी कामगिरी बजावली. सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 30 March 2024) असा आहे भाव?

सोन्याची घौडदौड

या आठवड्यात 26 मार्चला सोन्यात 100 रुपयांनी घसरण झाली. 27 मार्च रोजी 200 रुपयांनी भाव वधारला. 28 मार्च रोजी सोने 350 रुपयांनी महागले. तर 29 मार्च रोजीनुसार 1300 रुपयांची दरवाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची आगेकूच

या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 25 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी किंमती तितक्याच कमी झाल्या. 27 मार्च रोजी 300 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर 300 रुपयांची वाढ झाली. 29 मार्च रोजी 300 रुपयांनी भाव वधारला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,800 रुपये आहे.

गुडरिटर्न्सचा दावा काय

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 67,252 रुपये, 23 कॅरेट 66,983 रुपये, 22 कॅरेट सोने 61,603 रुपये झाले.18 कॅरेट 50439 रुपये, 14 कॅरेट सोने 39,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,127 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

  1. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  2. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.