AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी बुंगाट! असा वाढला भाव खतरनाक

Gold Silver Rate Today : सोने-चांदी आता थेट मैदानात उतरले आहे. त्यांना सत्तर हत्तीचे बळ मिळाल्याने किंमती जोरदार उसळल्या. आता सणासुदीला सुरुवात झाली. त्याअगोदरच सोने-चांदीने दरवाढीचा झेंडा फडकावला. गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. त्यामुळे खरेदीदारांना जास्त पैसा खर्च करावा लागला.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी बुंगाट! असा वाढला भाव खतरनाक
| Updated on: Aug 31, 2023 | 9:16 AM
Share

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : अखेर डॉलरचा डोलारा हलायला लागल्याने सोने-चांदीने मैदानात मुसंडी मारलीच. या महिन्याच्या शेवटच्या सत्रात जागतिक आणि देशातील बाजारात सोने-चांदी सातत्याने आगेकूच करत होते. पण अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने-चांदीला सूसाट धाव घेता येत नव्हती. डॉलर कमकूवत होताच, सोने-चांदीने मैदानात खुल के शक्तीप्रदर्शन केले. दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. डॉलरची दहशत कमी झाली तर चीनने जागतिक बाजारात एका दमात खरेदीचे संकेत दिले आहेत. या दोन्ही सकारात्मक बाबी या धातूंच्या पथ्यावर पडल्या. जागतिक बाजारात सोने गेल्या चार आठवड्यातील उच्चांकावर पोहचले आहे. अजून त्याला जुने रेकॉर्ड गाठायला अवकाश आहे. पण या दोन दिवसांत सोन्याने 500 रुपयांची तर चांदीने 700 रुपयांची घौडदौड केली. ऑगस्टच्या मधल्या टप्प्यात झालेल्या घसरणीला या चढाईने उत्तर देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल आहे, या दरम्यान सोने-चांदी (Gold-Silver Price Today 31 August 2023) कोणता पराक्रम गाजवतात, हे समोर येईलच.

शेवटच्या सत्रात मारली मुसंडी

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याने आक्रमक धोरण घेतले. ऑगस्टच्या सुरुवातीला 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दरवाढीला मोठा ब्रेक बसला. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 28 ऑगस्ट रोजी सोन्यात 50 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीची दमदार खेळी

16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वधारल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,292 रुपये, 23 कॅरेट 59,055 रुपये, 22 कॅरेट सोने 54,312 रुपये, 18 कॅरेट 44469 रुपये, 14 कॅरेट सोने 34,686 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,661रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.