Gold Silver Rate Today | अंतरिम बजेटपूर्वी सोने-चांदीचा वाढला तोरा; किंमतीत अशी आहे अपडेट

Gold Silver Rate Today 31 January 2024 | दोन दिवसांत सोने चमकले तर चांदी लकाकली. बजेटपूर्वीच सोने-चंदीने दरवाढीची वर्दी दिली. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत काय अपडेट समोर येते हे समोर येईल. जाणून घ्या काय आहेत किंमती...

Gold Silver Rate Today | अंतरिम बजेटपूर्वी सोने-चांदीचा वाढला तोरा; किंमतीत अशी आहे अपडेट
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 8:30 AM

नवी दिल्ली | 31 January 2024 : 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी सोमवारपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाली आहे. या आठवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. दोन दिवसांत सोने चमकले तर चांदी लकाकली आहे. बजेटपूर्वीच सोने-चांदीने दरवाढीची वर्दी दिली आहे. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदीच्या किंमती वधारल्याने बजेटनंतर मौल्यवान धातूत उसळी येते की, त्यात घसरण होते हे या आठवड्यात समोर येईल. सध्या अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 31 January 2024)

सोन्यात 300 रुपयांची वाढ

जानेवारी महिन्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोन्यात घसरणीचे सत्र सुरु आहे. तर इतर काही दिवसात दरवाढ दिसली. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. दोन दिवसांत सोन्यात 320 रुपयांची वाढ झाली. 29 जानेवारीला 100 तर 30 जानेवारी रोजी 220 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 1500 रुपयांची वाढ

जानेवारीत ग्राहकांची चांदी झाली. चांदीत 4400 रुपयांची घसरण आली. गेल्या आठवड्यात 1000 रुपयांची तर या आठवड्यात 500 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 29 जानेवारी रोजी 200 रुपयांची तर 30 जानेवारी रोजी 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,610 रुपये, 23 कॅरेट 62359 रुपये, 22 कॅरेट सोने 57,351 रुपये झाले. 18 कॅरेट 46,958 रुपये, 14 कॅरेट सोने 36,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,742 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.