Gold Silver Rate Today 31May 2024 : तीन दिवसांच्या चढाईनंतर नरमले सोने-चांदी, भाव आला असा झरझर खाली
Gold Silver Rate Today 31 May 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात दरवाढीचा कहर केला. तीन दिवसांत चांदीने षटकार तर सोन्याने चौकार हाणला. या दरवाढीला आता ब्रेक लागला आहे. ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळाला आहे.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सोने आणि चांदीने चांगला कहर केला. गेल्या आठवड्यात सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी 96 हजारांच्या घरात पोहचली होती. बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच 81,000 रुपयांची सलामी देईल. तर चांदीचा एक लाखांच्या घरात असेल. या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी चढाई केली होती. सोने 750 रुपये तर चांदीने 6000 रुपयांची झेप घेतली. या दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीत पडझड झाली. आता अशा आहेत मौल्यवान धातू्च्या किंमती (Gold Silver Price Today 31 May 2024 )
दरवाढीला लागला ब्रेक
गेल्या आठवड्यात सोने घसरणीवर होते. सोन्याची किंमत 2700 रुपयांनी उतरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला तीन दिवसांत त्यात 750 रुपयांची वाढ झाली. 27 मे रोजी 270, 28 मे रोजी 220 तर 29 मे रोजी 270 रुपयांनी सोने वधारले. 30 मे रोजी सोन्यात 440 रुपयांची घसरण आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 1200 रुपयांनी स्वस्त
या आठवड्यात चांदीने तीन दिवसांत 6 हजारांहून अधिकची झेप घेतली. 27 मे रोजी चांदीत 1500 रुपयांनी महागली. 28 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मोठी झेप घेतली. तर 29 मे रोजी त्यात 1200 रुपयांची भर पडली. 30 मे रोजी चांदीत तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीचा भाव घसरला. 24 कॅरेट सोने 72,115 रुपये, 23 कॅरेट 71,826 रुपये, 22 कॅरेट सोने 66,057 रुपये झाले. 18 कॅरेट 54,086 रुपये, 14 कॅरेट सोने 42,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,673 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.