Gold Silver Rate Today : खुशखबर! सोन्यापेक्षा चांदी पाच पट स्वस्त, भाव तर जाणून घ्या

Gold Silver Rate Today : गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीत आपटी बार सुरु आहे. सोन्यापेक्षा चांदीत जवळपास पाच पट घसरण झाली आहे. खरेदीदारांना ही चांगली संधी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किंमतीत मोठी उसळी दिसलेली नाही.

Gold Silver Rate Today : खुशखबर! सोन्यापेक्षा चांदी पाच पट स्वस्त, भाव तर जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या दिवशी सोने-चांदीत घसरण (Gold Silver Price Today) दिसून आली. पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंनी चमक दाखवली. गेल्या दोन दिवसांपासून आपटी बार सुरु आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीने दरवाढीची मोहिम हाती घेतली होती. पण दोन्ही धातूंना कोणताही जम बसविता आला नाही. नवीन विक्रम करता आलेला नाही. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीने खरेदीदारांना, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला. डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन गंगाजळी वाढल्याने सोने-चांदी घसरली. सोने दोन दिवसांत जवळपास 500 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. तर चांदी त्याच्या पाच पट स्वस्त झाली.

डॉलर मजबूत

अमेरिकन फेडरल बँकेने, जुलैच्या शेवटच्या टप्प्यात व्याजदर वाढवला. कामगार निर्देशांक, महागाई निर्देशांक पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. त्याचा परिणाम डॉलरवर दिसून आला. डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन तिजोरी भरली

कर्जाचे ओझे कमी होत आहे. व्याजदर वाढला. अमेरिकन तिजोरीत आवक वाढली. यामुळे गंगाजळीत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील वित्त आघाडीकडे अमेरिकेची वाटचाल सुरु आहे. गेल्या वर्षा नोव्हेंबरपासून परिस्थिती बिकट होती. त्यावर अमेरिका मात करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सोने-चांदीत पडझड दिसत आहे.

सोने आपटले

जुलै महिन्यात अर्ध्यांहून अधिक दिवस सोने-चांदी वधारलेले होते. पण जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही धातूत मोठी पडझड झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. तर 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत स्वस्ताई

जुलै महिन्यात चांदीत पडझड झाली होती. तर काही वेळा किंमती वधारल्या. ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली. दुसऱ्या दिवशी भावात 700 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. दोन दिवसांत 3 हजार रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपयांवर आला.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,310 रुपये, 23 कॅरेट 59,073 रुपये, 22 कॅरेट सोने 54,328 रुपये, 18 कॅरेट 44,483 रुपये, 14 कॅरेट सोने 34,696 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,197रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.