AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : स्वस्त झाले सोने-चांदी, तेजीच्या सत्राला लागला ब्रेक

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतींनी वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूत तेजीचे सत्र कायम आहे. किंमती आता रेकॉर्ड स्तराच्या जवळपास आहे. वर्षाच्या सुरुवातीला दोन दिवसांत दरवाढ कायम होती. पण या भाववाढीला ब्रेक लागला. दोन्ही धातू नरमले.

Gold Silver Rate Today : स्वस्त झाले सोने-चांदी, तेजीच्या सत्राला लागला ब्रेक
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 8:36 AM

नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : सोने-चांदीच्या किंमतीत वर्षाच्या सुरुवातीला ब्रेक लागला. नवीन वर्षातही सोने-चांदीची घौडदौड कायम होती. या नवीन वर्षाचे स्वागत दरवाढीने झाले होते. गेल्या महिन्यात, डिसेंबर 2023 मध्ये सोने-चांदीच्या किंमतींनी नवीन उच्चांक गाठला होता. हा रेकॉर्ड या वर्षाच्या सुरुवातीला तुटण्याची शंका होती. नवीन वर्षातील सुरुवातीच्या दोन दिवसांत मौल्यवान धातूंनी जोरदार चढाई केली. पण या घौडदौडीला ब्रेक लागला आहे. किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 4 January 2024)

सोन्याचा भाव घसरला

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोने 700 रुपयांनी वधारले होते. नवीन वर्षातही दरवाढीचे सत्र कायम होते. 2 जानेवारी 2024 रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. तर 3 जानेवारीला दरवाढीला ब्रेक लागला. भाव 270 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी झाली स्वस्त

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चांदी 1100 रुपयांनी महागली. नवीन वर्षांत चांदीच्या किंमती उसळल्या. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला. तर 3 जानेवारी रोजी किंमतीत तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,600 रुपये आहे. एका वर्षात चांदीने तगडा रिटर्न दिला आहे. चांदीने एका किलोमागे ग्राहकांना 7200 रुपयांची कमाई करुन दिली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,013 रुपये, 23 कॅरेट 62,761 रुपये, 22 कॅरेट सोने 57,720 रुपये झाले. 18 कॅरेट 47,260 रुपये, 14 कॅरेट सोने 36,863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,691रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.