Gold Silver Rate Today 5 July 2024 : सोने-चांदीची तुफान फटकेबाजी; एकाच दमात घेतली मोठी उडी, काय आहेत भाव तरी

Gold Silver Rate Today 5 July 2024 : सोने आणि चांदीने गेल्या काही दिवसांची मरगळ झटकली. महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील शेवटच्या सत्रात मोठी झेप घेतली. या आठवड्यात चांदीनंतर काल सोन्याने चमकदार कामगिरी केली. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 5 July 2024 : सोने-चांदीची तुफान फटकेबाजी; एकाच दमात घेतली मोठी उडी, काय आहेत भाव तरी
सोने-चांदीची मुसंडी, काय आहेत भाव तरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 8:28 AM

जून महिन्यानंतर सोने आणि चांदीने जुलैच्या पहिल्या आठवड्यात चमकदार कामगिरी केली. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूंनी मरगळ झटकली. एकाच दिवसात सोने आणि चांदीने दरवाढीत मोठी झेप घेतली. चांदीने या आठवड्यात मोठी मजल मारली आहे. चांदी पाठोपाठ सोन्याने एकाच दिवसात दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला. या दमदार कामगिरीमुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले. आज सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंनी तेजीचे संकेत दिले आहेत. अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 5 July 2024 )

सोन्यात जोरदार उसळी

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने वधारले होते. या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोन्याने दमदार कामगिरी केली. 2 जुलै 110 रुपयांनी सोने वधारले होते. 3 जुलै रोजी भाव स्थिर होता. 4 जुलै रोजी सोन्याने 710 रुपयांची उडी घेतली. आज सकाळी सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी एकदम डौलात

गेल्या आठवड्यात चांदीची चमक फिक्की पडली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र चांदीने दमदार घौडदौड सुरु ठेवली. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलैला 800 रुपयांनी, 3 जुलैला चांदी 500 रुपयांनी वधारली. 4 जुलै रोजी चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 72,469 रुपये, 23 कॅरेट 72,179 रुपये, 22 कॅरेट सोने 66,382 रुपये झाले. 18 कॅरेट 54,352 रुपये, 14 कॅरेट सोने 42,394 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,018 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.