Gold Silver Rate Today : चांदी घसरली, सोने किंचित वधारले, खरेदीदारांना असा होणार फायदा

Gold Silver Rate Today : चांदी घसरली तर सोने किंचित वधारले. सोने-चांदीत ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घसरणीचे सत्र दिसून आले. दोनदाच किंमती वाढल्या. सराफा बाजारात गेल्या आठवड्यात मोठी हालचाल दिसली नाही.

Gold Silver Rate Today : चांदी घसरली, सोने किंचित वधारले, खरेदीदारांना असा होणार फायदा
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:40 AM

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात डॉलरमधील घडामोडीमुळे सोने आणि चांदीला मोठी झेप घेण्यात अडचण येत आहे. गुंतवणूकदार अमेरिकन बाजारातील महागाईचे आकडे काय असतील या प्रतिक्षेत आहे. त्यानंतर ते सोने-चांदीत (Gold Silver Price Today) गुंतवणूक करायची की इतर पर्याय निवडायचा हे ठरवतील. त्यामुळे सोने-चांदीला मोठी उसळी घेण्यात अनुकूलता दिसत नाही. सोने-चांदीत ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घसरणीचे सत्र दिसून आले. दोनदाच किंमती वाढल्या. सराफा बाजारात गेल्या आठवड्यात मोठी हालचाल दिसली नाही. या आठवड्यात सोमवारी किंमतीत मोठी तफावत दिसली नाही. भावातील नेहमीचाच चढउतार आहे.जुलै महिन्यात मे आणि जून महिन्यासारखी स्वस्ताई नव्हती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती.

सोने 60,000 रुपयांच्या घरात

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते. सध्या 22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. या भावात काय तफावत दिसेल, हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

चांदी किंचित स्वस्त

गेल्या आठवड्यात शेवटच्या सत्रात चांदीने स्वस्ताईचा नारा दिला होता. सोमवारी पण चांदीत घसरण दिसून आली. 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. 4 ऑगस्ट रोजी पुन्हा 200 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.5 ऑगस्ट रोजी 300 रुपयांनी किंमती वधारली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,327 रुपये, 23 कॅरेट 59,089 रुपये, 22 कॅरेट सोने 54,344 रुपये, 18 कॅरेट 44,495रुपये, 14 कॅरेट सोने 34,706 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,848 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.