Gold Silver Rate Today | खुशखबर! सोने-चांदी झाले पुन्हा स्वस्त, अशी आहे किंमत

Gold Silver Rate Today 6 February 2024 | प्रेमाचा आठवडा आता सुरु होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच किंमतीत घसरण झाल्याने सोने-चांदी स्वस्त झाले आहे. त्यामुळे या आठवड्यात तुमच्या साथीदाराला मौल्यवान भेट देता येईल. आता असा आहे सोने-चांदीचा भाव?

Gold Silver Rate Today | खुशखबर! सोने-चांदी झाले पुन्हा स्वस्त, अशी आहे किंमत
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 8:38 AM

नवी दिल्ली | 6 February 2024 : उद्यापासून व्हॅलेंटाईन आठवडा सुरु होत आहे. या काळात अनेकांच्या भावना उचंबळून येतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेट देण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. सोने-चांदीच्या किंमतींनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी मौल्यवान भेट देण्यासाठी ही घसरण फायद्याची आहे. जानेवारीत सोने 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी घसरले. तर या महिन्याच्या सुरुवातीला सोने 300 रुपयांनी तर चांदीत 200 रुपयांची वाढले. घसरण झाल्याने अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 6 February 2024)

दरवाढीवर घसरणीचा उतारा

डिसेंबर 2023 मध्ये सोन्याने कमाल वाढ नोंदवली होती. या विक्रमानंतर या नवीन वर्षात सोन्याला भरारी घेता आली नाही. जानेवारीत सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले आणि त्यात वाढ पण झाली. फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही दरवाढ कायम होती. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. 5 फेब्रुवारी रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 1300 रुपयांनी स्वस्त

जानेवारीत चांदी 4400 रुपयांनी घसरली. तर शेवटच्या आठवड्यात 2 हजार रुपयांची उसळी घेतली. फेब्रुवारीची सुरुवात चढउताराने झाली. 1 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण. तर 2 फेब्रुवारी रोजी तेवढीच वाढ झाली. 3 फेब्रुवारी रोजी 1,000 रुपयांची स्वस्ताई आली. 5 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 62,512 रुपये, 23 कॅरेट 62,262 रुपये, 22 कॅरेट सोने 57,261 रुपये झाले. 18 कॅरेट 46,884 रुपये, 14 कॅरेट सोने 36,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,417 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.