Gold Silver Rate Today 6 June 2024 : आनंदवार्ता, चांदी दणकावून आपटली तर सोन्यात आली स्वस्ताई, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 6 June 2024 : सोने-चांदीत मोठी स्वस्ताई आली आहे. चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात घसरणीचे सत्र आहे. तर मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे.

Gold Silver Rate Today 6 June 2024 : आनंदवार्ता, चांदी दणकावून आपटली तर सोन्यात आली स्वस्ताई, अशा आहेत किंमती
सोने-चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 8:30 AM

देशात लोकसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. एनडीएला बहुमत मिळाले असले तरी घटक पक्षांचे महत्व वाढले आहे. त्याचा दुरगामी परिणाम व्यापार क्षेत्रावर पण दिसेल. निकालाअगोदर सोने-चांदीत मोठी घसरण दिसली. तर निकालानंतर दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंनी उसळी घेतली होती. आज बेशकिंमती धातूत पडझड झाली. चांदीला मोठा फटका बसला. तर सोने स्वस्त झाले. अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 6 June 2024 )

सोन्यात चढउताराचे सत्र

30 मेपासून दरवाढीला ब्रेक लागला होता. 4 जून रोजी सोन्याने मोठी मुसंडी मारली. 760 रुपयांनी सोन्यात दरवाढ झाली. या आठवड्यात चढउताराचे सत्र आहे. सुरुवातीला 3 जून रोजी 440 रुपयांची घसरण झाली. तर 5 जून रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 2300 रुपयांनी आपटली

30 मेपासून चांदीत मोठी घसरण झाली होती. किंमती पाच हजारांनी खाली आल्या होत्या. 4 जून रोजी चांदीने 1200 रुपयांची उसळी घेत या घसरणीला ब्रेक लावला होता. 5 जून रोजी किंमतीत 2300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,986 रुपये, 23 कॅरेट 71,698 रुपये, 22 कॅरेट सोने 65,939 रुपये झाले. 18 कॅरेट 53,990 रुपये, 14 कॅरेट सोने 42,112 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,530 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.