Gold Silver Rate Today 7 December 2024 : लग्नसराईत स्वस्त झाले सोने-चांदी, आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 7 December 2024 : लग्नसराईत सोने आणि चांदीत पुन्हा घसरण झाली. आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातुत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात बेशकिंमती धातुत चढउताराचे सत्र दिसले. आता अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती.

Gold Silver Rate Today 7 December 2024 : लग्नसराईत स्वस्त झाले सोने-चांदी, आता काय आहेत किंमती?
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 8:29 AM

लग्नसराईत वधू आणि वराकडील मंडळींसाठी आनंदवार्ता आली आहे. या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. या स्वस्ताईचा वऱ्हाडी मंडळींना पण फायदा होणार आहे. या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसले. सुरुवातीला किंमतीत स्वस्ताई आली तर नंतर भाव वधारले. या वर्षाअखेर दोन्ही धातुत मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतली सत्तानाट्याचा पण परिणाम बेशकिंमती धातुवर दिसून येईल. आता सराफा बाजारात अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 6 December 2024 )

आठवडाअखेरीस सोन्याचा दिलासा

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले. तर मंगळवारी सोने 430 रुपयांनी महागले. बुधवारी सोन्याच्या भाव जैसे थे होता. तर गुरूवारी 110 रुपयांनी किंमती वधारल्या. 6 डिसेंबर रोजी सोन्यात 250 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची काय वार्ता?

मागील काही दिवसांपासून चांदीत स्वस्ताई आणि सुस्तावलेपणा आलेला आहे. या सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतर चांदी सुस्तावली. तर 5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी वधारली. काल भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,187, 23 कॅरेट 75,882, 22 कॅरेट सोने 69,787 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,140 रुपये, 14 कॅरेट सोने 44,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.