Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावाची मोठी अपडेट, आली आनंदवार्ता

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांसाठी गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही आनंदवार्ता आणली. ग्राहकांची सराफा बाजारात एकच गर्दी उसळली आहे. सोने 1100 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली आहे. सोने-चांदीचा भाव मध्यंतरी भडकले होते. या घसरणीमुळे आता सोने-चांदीची अशी कमी झाली किंमत...

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावाची मोठी अपडेट, आली आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 8:36 AM

नवी दिल्ली | 9 जानेवारी 2024 : सोने-चांदीने मोठा दिलासा दिला. ग्राहकांनी बाजारात एकच गर्दी केली. सोने-चांदीचा भाव घसरला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ झाली होती. तर 3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरु झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला या दोन्ही धातूत पडझड झाली. किंमती पुन्हा भडकण्याची शक्यता घेत ग्राहकांनी खरेदीची लगबग केली. सोने 1100 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता सोने-चांदीचा असा भाव आहे (Gold Silver Price Today 9 January 2024)

सोन्याची स्वस्ताई

डिसेंबर महिन्यात सोने 66 हजारांच्या घरात पोहचले. 3 जानेवारी सोने इतकेच घसरले. 4 जानेवारी रोजी त्यात 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारी रोजी सोने 130 रुपयांनी उतरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. तर सोमवारी 8 जानेवारी रोजी 220 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने दिला ग्राहकांना दिलासा

गेल्या वर्षात चांदी महागली. तर 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारी रोजी किंमती 2000 रुपयांनी कमी झाल्या. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,400 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,192 रुपये, 23 कॅरेट 61,943 रुपये, 22 कॅरेट सोने 56968 रुपये झाले. 18 कॅरेट 46,644 रुपये, 14 कॅरेट सोने 36,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,386 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

  • भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  • काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.