Gold Silver Rate Today 9 January 2025 : ब्रेकनंतर सोने महागले, चांदीचा दिलासा, काय आहेत भाव आता?

Gold Silver Rate Today 9 January 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने मोठी झेप घेतली. त्यापाठोपाठ चांदीने पण महागाईची तुतारी फुंकली. त्यानंतर दोन्ही धातुत घसरण दिसली. यानंतर सोने पुन्हा वधारले. तर चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 9 January 2025 : ब्रेकनंतर सोने महागले, चांदीचा दिलासा, काय आहेत भाव आता?
सोने-चांदीचा भाव काय?
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 8:32 AM

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केला. दोन्ही धातुनी मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2 हजार रुपयांनी महागली. त्यानंतर या आठवड्यात चांदीत नरमाई कायम आहे. तर सोने पुन्हा वधारले. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होत आहे. त्यानंतर लवकरच सोने 90 हजारी सलामी देईल. तर चांदी 1 लाख 10 हजारांच्या घरात पोहचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या असा आहे या दोन मौल्यवान धातुचा भाव (Gold Silver Price Today 9 January 2025 )

सोने पुन्हा वधारले

गेल्या आठवड्यात सोन्याने महागाईचा कळस लावला. 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली. तर या सोमवार, मंगळवारी भाव स्थिर होता. बुधवारी त्यात 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 1100 रुपयांनी उतरली

चांदीने गेल्या काही दिवसात ग्राहकांना दिलासा दिला. जितका भाव वधारला, तितकीच त्यात घसरण झाली. गेल्या आठवड्यात 3 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी उसळली होती. तर 4 जानेवारीला 1 हजारांनी किंमत उतरली. तर या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वधारली. काल भाव स्थिर होता. तर आज सकाळी घसरणीचे संकेत मिळत आहेत.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,364, 23 कॅरेट 77,054, 22 कॅरेट सोने 70,865 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,023 रुपये, 14 कॅरेट सोने 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,503 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.