Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने आणली आनंदवार्ता! इतके झाले स्वस्त

Gold Silver Rate Today : सोने-चांदी सध्या दबावाखाली असल्याने सराफा बाजारात गर्दी उसळली आहे. सलग तीन दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र सुरु आहे. ही आनंदवार्ता आल्याने ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली आहे. या आठवड्यात सोने-चांदीच्या किंमती इतक्या स्वस्त झाल्या आहेत.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने आणली आनंदवार्ता! इतके झाले स्वस्त
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : डॉलरच्या मजुबतीने सोने-चांदीत घसरण सुरु आहे. सध्या दोन दिवस जगाचा केंद्रबिंदू भारत आहे. भारतात जी20 संमेलनाची लगीनघाई सुरु आहे. त्यातच डॉलरने उसळी घेतल्याने सोने-चांदीला मोठी कामगिरी बजावता आली नाही. गुंतवणूकदारांनी आता भारताकडे मोर्चा वळवला आहे. त्याचे परिणाम शेअर बाजारात दिसून येईल. सोने-चांदीतील (Gold Silver Rate Today 9 September 2023) ही पडझड किती दिवस राहील, हे समोर येईल. चीन कमकवूत अर्थव्यवस्थेशी झगडत आहे. तर युरोपियन राष्ट्रे मंदीचा सामना करत आहे. कच्चा तेलाच्या किंमती पण वधारल्या आहेत. या सर्वांचा परिणाम सोने-चांदीवर दिसून येईल. गेल्या तीन व्यापारी सत्रात दोन्ही मौल्यवान धातूत मोठी घसरण झाली आहे. किंमती इतक्या उतरल्या आहेत.

सोने दबावाखाली

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात एक दोन दिवस सोडले तर सोने दबावाखाली आहे. 1 सप्टेंबर सोने स्वस्त झाले. 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भाव जैसे थे होते. 4 सप्टेंबर भाव 100 रुपयांनी वधारले. 5 आणि 6 सप्टेंबरला भाव उतरले. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. 7 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 160 रुपयांनी उतरला. 8 सप्टेंबर रोजी भाव किंचित वधारला. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

हे सुद्धा वाचा

चांदी झाली स्वस्त

सप्टेंबर महिन्यात चांदीचे भाव 3600 रुपयांनी उतरले. ऑगस्ट महिन्यात शेवटच्या सत्रात किंमतीत वाढ झाली होती. 1 सप्टेंबरला 500 रुपयांची, 2 सप्टेंबर रोजी 200, 4 सप्टेंबर रोजी 700, 5 सप्टेंबरला 1000 तर 6 सप्टेंबर रोजी 500 आणि 7 सप्टेंबर रोजी 700 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,171 रुपये, 23 कॅरेट 58,934 रुपये, 22 कॅरेट सोने 54,201 रुपये, 18 कॅरेट 44378 रुपये, 14 कॅरेट सोने 34,615 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 71,017 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.