Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे कमबॅक! पुन्हा दाखविला जलवा, इतके झाले महाग

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली. अनेक दिवसांपासून थंडावलेल्या बाजारात पुन्हा चैतन्य पसरले. दोन्ही मौल्यवान धातू महाग झाले.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे कमबॅक! पुन्हा दाखविला जलवा, इतके झाले महाग
इतके झाले महाग
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 9:08 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Rate Today) शुक्रवारी जोरदार मुसंडी मारली. गेल्या एक महिन्यापासून या मौल्यवान धातूंनी नरमाईचे धोरण आखले होते. जून महिन्यातच सोन्यात हजार रुपयांहून अधिकची पडझड झाली. तर चांदीच्या किंमती पण मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीत. मे महिन्यात पण सोने-चांदीला कोणताही नवीन रेकॉर्ड नावावर नोंदविता आला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मात्र या दोन्ही धातूंनी ग्राहकांना धक्क्यावर धक्के दिले होते. शुक्रवारी सकाळच्या सत्रात घसरणीचा सूर असताना दुपारनंतर नूर पलटला. सोन्यात 400 रुपयांची वाढ झाली तर चांदीने 1100 रुपयांची चढाई केली. शनिवारी, 10 जून रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचा सूर आहे.

पाचव्या दिवशी काय स्थिती

  1. या आठवड्याच्या पाचव्या दिवशी सोने 389 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले.
  2. सोने 59,976 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. इतर दिवशी सोन्यात पडझडीचे सत्र होते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. गुरुवारी सोने 441 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. 8 जून रोजी सोने स्वस्त होऊन 59587 रुपयांवर स्थिरावले.
  5. बुधवारी (Gold Price) 68 रुपये प्रति 10 ग्रॅमने सोने स्वस्त होऊन 60028 रुपयांवर बंद झाले.
  6. गुरुवारी चांदीत तेजी दिसून आली. चांदी 175 रुपयांनी महागली. हा भाव 71999 रुपये किलोवर पोहचला.
  7. बुधवारी चांदी 80 रुपयांनी स्वस्त होऊन 71824 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
  8. ibjarates नुसार हे सर्व भाव आहेत. शुक्रवारी चांदीचा भाव 73,677 रुपये किलो होता.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 24 कॅरेट सोने 59976 रुपये, 23 कॅरेट 59736 रुपये, 22 कॅरेट सोने 54938 रुपये, 18 कॅरेट 44982 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35086 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.