Gold Silver Rate Today | सुवर्णनगरीत सोने ६७ हजारांच्या घरात; चांदीने ७३ हजारांचा आकडा केला पार

Gold Silver Rate Today | जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कहर केला. सोन्याची ७० हजारांकडे वाटचाल सुरु आहे. तर चांदीने पण ७५ हजारांकडे कूच केली आहे. मार्च महिन्यात सोने आणि चांदीने मोठा पल्ला गाठला आहे. एका आठवड्यात सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Rate Today | सुवर्णनगरीत सोने ६७ हजारांच्या घरात; चांदीने ७३ हजारांचा आकडा केला पार
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 3:19 PM

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,जळगाव | 9 March 2024 : सुवर्णनगरीत सोने आणि चांदी अगदी सूसाट आहे. सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर पोहचले ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर ७४ हजार प्रति किलो वर पोहोचले. एका आठवड्यात सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. या वर्षात आतापर्यंतची सोन्याच्या दरात झालेली सर्वात मोठी वाढ ठरली आहे. चांदीच्या भावातही १२०० रुपयांनी वाढ झाली. चांदीचा दर ७४ हजार प्रति किलोवर पोहोचला. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे.

आता असा आहे भाव

  1. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे आजचे ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले असून जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते.अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने मार्चच्या सुरुवातीला सोन्यात भाववाढ सुरू झाली.
  2. त्यामुळे ५ मार्च रोजी सोने ६४ हजार ६५० रुपयांवर पोहोचले. ६ रोजी ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झालेल्या सोन्याने ७ रोजी ६५ हजारांचा पल्ला ओलांडला व ते ६५ हजार ४०० रुपये प्रतितोळा झाले. ८ मार्च रोजी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ होऊन ते ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले.
  3. हे सुद्धा वाचा
  4. तर चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून फारशी वाढवते ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपये वाढ झाली. चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही भाव ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
  5. ऐन लग्न सराईंचे दिवस आहे, यातच सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. तर सोन्याचे दर वाढल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे बजेट मात्र कोलमडले आहे.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.