Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : स्वस्ताईचा पाऊस! सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या निच्चांकावर, चांदी खरेदीची सुवर्णसंधी

Gold Silver Rate Today : सोन्यासह चांदीला लागला दम, जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम, सोने-चांदी खाली दबावाखाली आल्याने भाव तीन महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले. किंमतीत बाबत जाणून घ्या ताजे अपडेट..

Gold Silver Rate Today : स्वस्ताईचा पाऊस! सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या निच्चांकावर, चांदी खरेदीची सुवर्णसंधी
सोने-चांदीचा दर काय
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:12 AM

नवी दिल्ली : रशियातील बंडाचा, रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम जागतिक बाजारात दिसून येत आहे. तुम्हाला वाटत असेल भारतातील सोने-चांदीच्या (Gold Silver Price Today) सराफा बाजारावर कसा काय परिणाम होऊ शकतो. तर सोने-चांदीचे मोठे उत्पादन भारतात होत नाही. भारत सोने-चांदीसाठी परदेशावर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक घडामोडींचा परिणाम लागलीच दिसून येतो. जागतिक बाजारात सोने-चांदी तीन महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहे. भारतीय सराफा बाजारात हीच स्थिती आहे. वॅगनर ग्रुपच्या (Wagner Mercenary Group) बंडानंतर पुतिन यांच्या एकाधिरशाहीला मोठा शह बसला आहे. बाजारात अमेरिकन डॉलर अजून मजबूत झाला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे दोन्ही मौल्यवान धातू दबावाखाली आले आहेत. किंमतीत बाबत जाणून घ्या ताजे अपडेट..

सराफा बाजारात सोने वधारले भारतीय सराफा बाजारात मे महिन्यापासून सतत पडझड सुरु आहे. आठवड्यात एकदा सोने-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ होते. गेल्या आठवड्यात 24 जून रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 150 रुपयांनी तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 160 रुपयांनी महागले. भाव अनुक्रमे 54,400 रुपये आणि 59,330 रुपयांवर पोहचले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, 26 जून रोजी 22 आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 100 रुपयांनी महागले. किंमती अनुक्रमे 54,500 रुपये आणि 59,430 रुपयांवर पोहचले. आज 27 जून रोजी सकाळच्या सत्रात बातमी लिहीपर्यंत भाव अपडेट झालेले नव्हते. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवारी, 26 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,726 रुपये, 23 कॅरेट 58,491 रुपये, 22 कॅरेट सोने 53,793 रुपये, 18 कॅरेट 44,045 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34355 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली होती. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 68,304 रुपये होता. त्यात एक हजारांची वाढ होऊन हा भाव 27 जून रोजी 69,392 रुपयांवर आला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

हॉलमार्कनुसार कॅरेट भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.