Gold Silver Price : सोने महागले, चांदीच्या किंमतीत घट, आजचे भाव जाणून घ्या..

Gold Silver Price : सोन्यात आजही चकाकी दिसून आली, तर चांदीतील घसरण कायम आहे..

Gold Silver Price : सोने महागले, चांदीच्या किंमतीत घट, आजचे भाव जाणून घ्या..
सोन्याची चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यासह दोन पोलिसांना अटकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 3:35 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market)  शुक्रवारी, 18 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर (Gold Rate) वधारलेले होते. तर चांदीतील घसरण कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींनी चांगलीच उसळी घेतली आहे. सोन्याचे दर पंधरवाड्यात 2500 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपयांच्या आत बाहेर आहे.

999 शुद्धतेच्या सोन्याने 52,000 रुपयांचा टप्पा पार केला असून 999 शुद्धतेची चांदी किलोमागे 61,000 रुपयांच्या पुढे आहे. सोन्याचे भाव 56,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव तेजीत आहेत.

ibjartes.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याचा दर शुक्रवारी 52,952 रुपये होता. तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,706 रुपये, 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,473 रुपये, 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 39,689 रुपये होता.

हे सुद्धा वाचा

तर 585शुद्ध सोन्याचा दर 30,957 रुपये झाला. सोन्याचे दरात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सोन्याची वाटचाल 56 हजारांकडे सुरु आहे. 999 शुद्ध एक किलो चांदीचा दर घसरुन 61,200 रुपये झाला.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.