Gold Price Update : सोने आपटले तोंडावर! भावात झाली झरझर घसरण, 14 कॅरेट तर अवघे..
Gold Price Update : सोने-चांदीच्या भावाला सध्या ब्रेक लागला आहे. सोने तोंडावर आपटले आहे. 24 ते 14 कॅरेटची किंमत काय आहे जाणून घ्या..
नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने तेजी दिसून येत आहे. मध्यंतरी सोन्याच्या भावात घसरण झाली. पण ही घसरण काही काळापुरतीच होती. सराफा बाजारात तर 19 एप्रिलनंतर सोने-चांदीची (Gold Silver Price ) घौडदौड थंडावली आहे. आता दोन आठवड्यात भावात 100 रुपयांची दरवाढ दिसून आली आहे. एप्रिलच्या शेवटी सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी सोन्याचे भाव 60168 प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74000 रुपये प्रति किलो होता. शनिवारी 24 कॅरेटचा भाव 60,970 रुपये प्रति तोळा होता.
सोमवारी जाहीर होतील भाव इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीच्या दिवशी भाव जाहीर करत नाही. केंद्र सरकारद्वारे घोषीत सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीचा भाव जाहीर करण्यात येत नाही. तसेच शनिवार-रविवारी सुद्धा रेट जाहीर होत नाहीत. आता सोने-चांदीचे नवीन भाव सोमवारी जाहीर करण्यात येतील.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्ली सराफा बाजारानुसार, 24 कॅरेट सोने 347 रुपयांनी स्वस्त होऊन 60168 रुपये, 23 कॅरेट सोने 346 रुपयांनी स्वस्त होऊन 59927 रुपये, 22 कॅरेट सोने 288 रुपयांनी घसरुन 55114 रुपये, 18 कॅरेट सोने 260 रुपयांनी सस्त होऊन 45126 रुपये आणि 14 कॅरेट सोने 203 रुपयांनी घसरुन 35198 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा भाव कोणत्याही कराशिवाय जाहीर होतात.
आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 30 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम, 56,000 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा 76,400 रुपये भाव आहे.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.