Gold-Silver Weekly Report : आठवडाभरात सोने 1,063 रुपयांनी महागले; चांदीच्या दरातही तेजी
चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver prices) तेजी दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या वेबसाईटनुसार या आठवड्यात सराफा बाजारामध्ये सोन्याची किंमत 1,063 रुपयांनी वाढून 53,220 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली.
चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver prices) तेजी दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या वेबसाईटनुसार या आठवड्यात सराफा बाजारामध्ये सोन्याची किंमत 1,063 रुपयांनी वाढून 53,220 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी अकरा एप्रिल रोजी सोन्याची किंमत 52,157 रुपये एवढी होती. ती वाढून रविवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 53,220 रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी दिसून आली.चालू आठवड्यात चांदी (silver) 69 हजार रुपयांवर पोहोचली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा दर 67,063 रुपये किलो होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीचे दर 69 हजार रुपये प्रति किलो झाले. याचाच अर्थ या आठवड्यामध्ये चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
चालू वर्षात सोन्याच्या दरात 3,878 रुपयांची वाढ
जानेवारी 2022 पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात तोळ्यामागे तब्बल 3,878 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी सोन्याचे दर 48,279 रुपये प्रति तोळा होता. ते सतरा एप्रिल रोजी 52,157 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 62,035 रुपये होते. ते वाढून आज 69,316 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे सरसरी सात हजारांची वाढ झाली आहे. यंदा सोने आणि चांदीचे दर वाढत असून, सोन्यातील गुंतवणूक देखील वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.
सोने 55 हजारांवर जाण्याची शक्यता
येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर पडला असून, महागाई वाढत आहे. सोन्या, चांदीचे दर देखील वाढले आहेत. भारत हा चीन नंतर सोने आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. भारतात सराफा मार्केटची गरज पूर्ण करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. सोन्याचे भाव वाढत असल्याने गुंतवणूक देखील वाढत आहे.
संबंधित बातम्या
inflation effect : इंधन दरवाढीचा परिणाम, पेट्रोल, डिझेलच्या मागणीत घट
Buldana ST | बुलडाण्यातील एसटीची महिन्याला 45 लाखांची बचत; 450 बसपैकी 150 बस सुरू, बचतीचे कारण काय?
Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय