AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Sliver Price Today | सोन्या-चांदीच्या दरांत तेजी, मात्र सोने अद्याप नीचांकावरच! वाचा आजचे दर…  

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, अर्थात सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. (Gold Sliver latest rate 22 February)

Gold-Sliver Price Today | सोन्या-चांदीच्या दरांत तेजी, मात्र सोने अद्याप नीचांकावरच! वाचा आजचे दर...  
| Updated on: Feb 22, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, अर्थात सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान सोने (आज सोन्याचा भाव) 103 रुपयांनी वाढून, 46300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. तर, त्याचबरोबर चांदी 361 रुपयांच्या दरवाढीसह 69373 रुपये प्रतिकिलोवर होती. ग्लोबल मार्केटमध्ये तेजी असल्याने, देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांतही वाढ पाहायला मिळाली (Gold Sliver latest rate on 22 February in mumbai, Nagpur, Nashik, Pune and jalgaon).

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) प्रति ग्रॅम :

मुंबई : 46,130 /- रुपये

पुणे : 46,130 /- रुपये

नागपूर : 46,130 /- रुपये

नाशिक : 46,130 /- रुपये

जळगाव : 46,853 /- रुपये

आजचा चांदीचा भाव प्रति किलो :

मुंबई : 69,000 /- रुपये

पुणे : 69,000 /- रुपये

नागपूर : 69,000 /- रुपये

नाशिक : 69,000 /- रुपये

जळगाव : 73,650 /- रुपये

मुंबई, पुणे, नशिक, नागपूरमध्ये सोने-चांदीचा दर हा एकाच पातळीवर आहे, तर जळगाव सराफा बाजारात मात्र याचा भाव काहीसा चढा दिसला आहे (Gold Sliver latest rate on 22 February in mumbai, Nagpur, Nashik, Pune and jalgaon).

तब्बल 9000 हजारांनी झाले स्वस्त!

गेल्या 6 महिन्यांत सोन्याच्या किंमती तब्बल 9000 रुपयांनी कमी झाल्या आहेत. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर 10 ग्रॅममध्ये 0.24 टक्क्यांनी वधारून 46,350 रुपये झाला. ऑगस्टमध्ये हा सोन्याचा दर 56200 रुपये इतका होता. बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात घट झाल्याने यावर्षी मागणीही वाढेल. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 58000 रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. तर, चांदीचे भाव देखील 1 लाख रुपयांपर्यंत जातील, असे म्हटले जात आहे. एमसीएक्सवरील चांदीचा मार्च वायदा सुमारे 69300 रुपये प्रतिकिलोवर आहे. यावर्षी जूनपर्यंत एमसीएक्सवर सोन्याचा दर 10 ग्रॅम 54000 रुपयांपर्यंत पोहोचेल. 2021 मध्ये एमसीएक्सवर चांदीचा दर 1 लाख रुपयांवर पोहोचू शकेल, तर जूनपर्यंत चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.

15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सोन्याच्या किमतीत काय फरक?

7 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत (Gold Price) सर्वाधिक होती, जेव्हा सोन्याने 56,254 ची उच्च पातळी गाठली होती. परंतु मागील आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास 12 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचा भाव 47,386 वर बंद झाला. म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी सोने 142 रुपयांनी स्वस्त झाले आणि 21 फेब्रुवारीला सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 46,190.00 रुपयांवर आले. म्हणजे आठवड्यात 1196 रुपयांची घसरण नोंदली गेली.

(Gold Sliver latest rate on 22 February in mumbai, Nagpur, Nashik, Pune and jalgaon)

हेही वाचा :

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.