7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच मान्सून गिफ्ट! या तारखेला होणार महागाई भत्त्याची घोषणा

7th Pay Commission latest news today: देशभरातील केंद्रीय कर्मचा-यांसाठी खुशखबर आहे. त्यांचा प्रलंबित महागाई भत्याचा (DA) मार्ग मोकळा झाला आहे. या तारेखाला डीए विषयी सरकार घोषणा करु शकते ?

7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच मान्सून गिफ्ट! या तारखेला होणार महागाई भत्त्याची घोषणा
महागाई भत्त्याचे गिफ्टImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:01 AM

DA Good News : मान्सूनने संपूर्ण देश व्यापाला आहे. सगळीकडे हिरवळ पसरल्याने मन मोहरुन गेले आहे. त्यातच आता एक एक आनंद वार्ता येऊन धडकत आहेत. खाद्यतेल (Edible Oil) कमी झाले आहे. पेट्रोल-डिझेलवर दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यातच केंद्रीय कर्मचा-यांसाठी (Central Employees) आणखी एक आनंद वार्ता येऊन धडकली आहे. त्यांचा थकीत महागाई भत्ता (Dearness allowance News) त्यांना लवकरच मिळणार आहे. जुलैमध्ये ही घोषणा होणार होती. पण आता हा दिलासा ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात 4 टक्के महागाई भत्याच्या वाढीची घोषणा होऊ शकते. भारतीय ग्राहक दर निर्देशांकांच्या(All India Consumer Price Index) मे महिन्यातील आकड्यांनी महागाई दरा सुनिश्चित केला आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ क्रमप्राप्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी केंद्रीय कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत महागाई भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 रोजीपासून लागू होईल. घोषणेनंतर लागलीच ऑगस्टमध्ये वाढीव महागाई भत्त्याची रक्कमेसह पगार मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचा-यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

DA थकला

सरकार केंद्रीय कर्मचा-यांना थकीत महागाई भत्ता देण्याचा विचार करत आहे. जुलै महिन्यापासून ही रक्कम अदा करण्यात येण्याची शक्यता आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 या एकूण 18 महिन्यांतील महागाई भत्ता सरकारने थकविला आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. संघटनांनी अनेकदा सरकारकडे याविषयीची कैफियत मांडली आहे. सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. आता केंद्रीय कर्मचा-यांना एकदाच दोन लाख रुपये महागाई भत्ता थकबाकीसह मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

भत्त्यात होणार वाढ

सरकार जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचा-यांच्या डीएमध्ये वाढ करु शकते. वाढत्या महागाईचा मुकाबला करण्यासाठी कर्मचा-यांना सरकार ही भेट देईल. डीएमध्ये 4 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या कर्मचा-यांना 34 टक्क्यांनी कर्मचा-यांना भत्ता देण्यात येतो. सरकारने यावर्षी मार्च महिन्यात भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली होती. वाढत्या महाईत सरकार कर्मचा-यांना खुशखबरी देऊ शकते.

DA वाढ कशी ठरणार?

भारतीय ग्राहक दर निर्देशंकावर (All India Consumer Price Index News)केंद्रीय कर्मचा-यांना किती महागाई भत्ता देण्यात येणार हे ठरते. जर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असेल तर महागाई भत्ता ही त्याच प्रमाणात वाढतो. यावर्षाच्या सहामाहीत भारतीय ग्राहक दर निर्देशांकाचे आकडे आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात डीएम मध्ये 4 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अजून जून महिन्याचे आकडे आलेले नाहीत. जर निर्देशंकाने 130 चा आकडा पार केला तर महागाई भत्ता 5 टक्के वाढू शकतो.

असा देण्यात येतो डीए

महागाई भत्ता कर्मचा-यांना त्यांच्या वेतनाच्या आधारावर देण्यात येतो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात फरक असतो. तो या क्षेत्रानुसार बदलतो. महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या आधारे देण्यात येतो. महागाई भत्त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कर्मचा-यांच्या मूल्य सुचकांआधारे हा भत्ता देण्यात येतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.