नशीबच पालटलं! IIT च्या विद्यार्थ्याला उबरकडून थेट 2 कोटींपेक्षा जास्त पगाराची ऑफर
iit student : उबरने अद्याप त्यांच्या पॅकेजवर भाष्य केलेले नाही. अहवालानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, उबेर हैदराबाद आणि बंगळुरू येथील केंद्रांसाठी अभियंत्यांची नियुक्ती करीत आहे. या चालू भरती मोहिमेचा एक भाग म्हणून Uber IITs सह देशभरातील टॉप टेक्नॉलॉजी कॅम्पसला भेट देत आहे. कंपनी पदवीधरांना तेथे उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची संधी देत आहे.
नवी दिल्लीः Uber Technologies: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीजच्या अंतिम प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी Uber Technologies ने विद्यार्थ्यांना सर्वाधिक पगार देऊ केलाय. कंपनीने 2 कोटी रुपये अधिक वेतन देण्याची ऑफर दिलीय. सॅन फ्रान्सिस्को स्थित मोबिलिटी सेवा कंपनीने IIT बॉम्बेने भरवलेल्या कॅम्पसमधअये मद्रास, रुरकी, कानपूर, गुवाहाटी आणि वाराणसी येथे नोकरीची ही ऑफर दिलीय.
सहा वर्षांच्या कालावधीनंतर IIT कॅम्पसमध्ये 2 कोटींचे पॅकेज
ET च्या अहवालानुसार, Uber चे वेतन पॅकेज सुमारे 274,250 डॉलर म्हणजे भारतीय चलनात 2.05 कोटी रुपये आहेत. यामध्ये $128,250 (सुमारे 96 लाख रुपये) चे मूळ वेतन, टार्गेट रोख बोनस, न्यू हायर ग्रांट आणि साइन इन बोनस समाविष्ट आहे. तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये 2 कोटींचे वेतन पॅकेज देण्यात आलेय. गेल्या वर्षी आयआयटीमध्ये टॉप पॅकेज दोन लाख डॉलर्स होते. म्हणजेच सुमारे 1.48 कोटी रुपये होते. ते सॅन फ्रान्सिस्को येथील कोहेसिटी या आयटी कंपनीचे होते.
हैदराबाद आणि बंगलोर कार्यालयांसाठी ऑफर
उबरने अद्याप त्यांच्या पॅकेजवर भाष्य केलेले नाही. अहवालानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, उबेर हैदराबाद आणि बंगळुरू येथील केंद्रांसाठी अभियंत्यांची नियुक्ती करीत आहे. या चालू भरती मोहिमेचा एक भाग म्हणून Uber IITs सह देशभरातील टॉप टेक्नॉलॉजी कॅम्पसला भेट देत आहे. कंपनी पदवीधरांना तेथे उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची संधी देत आहे.
पोस्टिंगसाठी 1 कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज
अनेक आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात पोस्टिंगसाठी 1 कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज ऑफर केले जाते. 1 कोटीच्या वरच्या पॅकेजच्या संख्येत आता वाढ झालीय. टॉप टेक टॅलेंटसाठी जागतिक स्तरावर एक कठीण स्पर्धा सुरू आहे. क्वांटबॉक्स रिसर्च, ग्रॅव्हिटी रिसर्च, दा विंची डेरिव्हेटिव्हज आणि क्वाडे यांसारख्या उच्च ट्रेडिंग कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी निवडलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वेतन पॅकेजेस ऑफर करणाऱ्या कंपन्यांपैकी आहेत. दा विंची सुमारे 1.3 कोटी रुपयांचे पॅकेज देते.
देशांतर्गत देऊ केलेले पॅकेजेस 1.8 कोटी रुपयांपर्यंत
यापैकी काही कंपन्यांनी देऊ केलेले देशांतर्गत पॅकेजेस 1.8 कोटी रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये दुसऱ्या वर्षाचा बोनस आणि साइन-इन बोनसचाही समावेश आहे. तसेच नॉन कॅश फायदे आणि ESOP देखील आहेत. सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंटचे प्रमुख अभिषेक कुमार म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पॅकेजेसने यंदा नवीन उंची गाठली. ते म्हणाले की, सुरुवातीच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की, सरासरी पगार गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल. संस्थेला उबरकडून आंतरराष्ट्रीय ऑफर मिळालीय.
संबंधित बातम्या
20000 रुपयांत ‘या’ वनस्पतीची करा लागवड, 3.5 लाख सहज कमवा, कसे ते जाणून घ्या?
दर महिन्याला 25000 ची बचत अन् 3.32 कोटी मिळणार, SIP मध्ये जबरदस्त फायदा